शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या युवकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श बाळगावा: कृषी मंत्री नाईक

By आप्पा बुवा | Updated: April 14, 2023 17:51 IST

फोंडा नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

फोंडा - एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन , समोर असलेल्या परिस्थितीशी दोन हात करत, त्याकाळी बॅरिस्टर पदवी मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर हे समस्त युवा पिढीसाठी आदर्श असून, जीवनात जर उच्च पदावर पोहोचायचे असेल तर प्रत्येक युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श बाळगावा. असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले. फोंडा नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नगरपालिका उद्यानात असलेल्या डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळी त्यांनी आदरांजली वाहिली. नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक , नगरपालिकेचे पदाधिकारी , कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना रवी नाईक पुढे म्हणाले की 'भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी तत्कालीन सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिली तिथेच परिवर्तनाची ताकद लोकांना कळून चुकली. अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांमध्ये निर्माण केली. त्यांच्यामुळेच तर तळागाळातील खितपत पडलेल्या लोकांमध्ये नवीन चेतना निर्माण झाली व त्यांनी आज समाज उभारण्याचा कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.