शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मद्यालयांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 02:48 IST

पणजी : राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरच्या परिघात असलेल्या ३,२१० मद्यालयांचे भवितव्य अजूनही टांगणीला लागलेले आहे.

पणजी : राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरच्या परिघात असलेल्या ३,२१० मद्यालयांचे भवितव्य अजूनही टांगणीला लागलेले आहे. आज ३१ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा होणार आहे. त्यानंतरच गोव्यातील या मद्यालयांचे भवितव्य काय ते कळून येईल.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा डिसेंबर २०१६ मधील आदेश हा केवळ रिटेल दारू दुकानांना लागू होतो, बार व रेस्टॉरंटना लागू होत नाही अशी भूमिका घेतली. सरकारच्या अर्थ खात्याने त्यानुसार भूमिका घेतली. त्यामुळे महामार्गांच्या बाजूची गोव्यातील केवळ साडेसातशे रिटेल दारू दुकाने बंद होतील, असे चित्र निर्माण झाले होते. राज्य सरकारने अ‍ॅडव्होकेट जनरलांशी चर्चा करून ही भूमिका घेतली होती. त्या भूमिकेत अजून बदल झालेला नाही; पण सर्वोच्च न्यायालयासमोर अन्य राज्यांनी मद्यालयप्रश्नी फेरविचार याचिका सादर केलेल्या आहेत. या याचिकांच्या अनुषंगाने बुधवारी व गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अभ्यासपूर्ण युक्तिवाद झाले. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्या आहे. आपण आपला निवाडा शुक्रवारपर्यंत राखून ठेवत असल्याचे खंडपीठाने सांगितले. आज शुक्रवारी निवाडा दिला जाणार आहे. महामार्गांच्या बाजूला असलेल्या दारू दुकानांमध्ये मद्यप्राशन करून मग वाहन चालविले जात असल्याने महामार्गांवर अपघात होतात व त्यात अनेकांचा बळी जातो, अशा दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरमध्ये न्यायालयाने आदेश दिला होता. त्यात नेमका कोणता बदल केला जातो याकडे मद्य व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे. गोवा सरकारने न्यायालयात फेरविचार याचिका सादर केलेली नाही; पण अन्य राज्यांनी ती केली आहे.महामार्गांच्या बाजूच्या ३,२१० मद्यालयांच्या परवान्यांचे गोव्याच्या अबकारी खात्याने अजून नूतनीकरण केलेले नाही. आज शुक्रवारी परवान्यांची मुदत संपुष्टात येत आहे. आज फेरविचार याचिकांवर न्यायालय कोणता आदेश देते याकडे अबकारी खात्याचे लक्ष आहे.(खास प्रतिनिधी)