शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

वाघांना टाकले वाळीत

By admin | Updated: January 24, 2015 01:53 IST

भाजप नाराज : कामे न करण्याची मंत्र्यांना सूचना

पणजी : कळंगुट येथे झालेल्या भाजपच्या चिंतन बैठकीवर बहिष्कारानंतर आमदार विष्णू वाघ यांना भाजपने आता पूर्ण वाळीतच टाकले आहे. आमदार वाघ यांची कामे न करण्याची सूचना भाजपतर्फे सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. स्वत: वाघ यांनाही या सूचनेची कल्पना आहे. वाघ यांनी चिंतन बैठकीसाठी यावे म्हणून भाजपने प्रयत्न केला होता; परंतु वाघ यांना कोणतेही पद न देता ठेवले गेल्यामुळे वाघ यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. चिंतन बैठकीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका वाघ यांनी घेतली. वाघ यांच्याविषयी भाजपच्या चिंतन बैठकीत बरीच चर्चा झाली. वाघ यांची कोणतीच कामे कुणी करू नका, अशी सूचना त्या वेळी मंत्र्यांना केल्याची माहिती मिळते. चिंतन बैठकीतून ही माहिती बाहेर फुटली व काही आमदारांकडून वाघ यांना याची कल्पना मिळाली. एरव्ही देखील सांतआंद्रे मतदारसंघाशी संबधित आपली कामे मंत्री करतच नव्हते, त्यामुळे आताही काही फरक पडणार नाही, असा अलिखित संदेश वाघ यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविला. एकंदरीत वाघ यांची पूर्ण राजकीय कोंडी केली आहे. तरीही वाघ यांना भाजपमध्ये काय चालते याची बरीच माहिती त्यांच्या काही हितचिंतकांकडून मिळत आहे. (खास प्रतिनिधी)