फोंडा : साईगड आडपई दुर्भाट येथील श्री साई मंदिरात येत्या दि. ८ मे रोजी एकनाथ रघुवीर नाईक - आडपई यांच्यातर्फे साप्ताहिक गुरूवार उत्सव साजरा केला जाणार आहे.यानिमित्त सकाळी ५.१५ वाजता काकड आरत्या, यजमानांच्या हस्ते साई मूर्तीस मंगलस्नान, अभिषेक, नैवेद्य व तीर्थप्रसाद होईल. संध्याकाळी ७ वाजता श्री बलभीम महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, ८ वाजता साईंचा पालखी उत्सव, ८.३0 वाजता महाआरती, त्यानंतर साईदर्शन सोहळा, तीर्थप्रसाद व महानैवेद्याने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर्व साई भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आडपई साई मंदिरात गुरूवारउत्सव
By admin | Updated: May 7, 2014 00:57 IST