शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत दिव्यांगांना आता मोफत उपकरणे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 15:46 IST

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत राज्यातील सर्व दिव्यांग तसेच वरिष्ठ नागरिकांना लागणारी उपकरणे आता माेफत मिळणार आहेत.

नारायण गावसपणजी : प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत राज्यातील सर्व दिव्यांग तसेच वरिष्ठ नागरिकांना लागणारी उपकरणे आता माेफत मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा दिव्यांग लोकांनी लाभ घ्यावा. आता अनेक वर्षे दिव्यांग व्यक्तीला लागणाऱ्या वस्तूंसाठी वाट पाहण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बांबाेळी येथील गाेवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पहिले प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांच्या सोबत मडगावचे आमदार दिगंबर कामात, राज्य दिव्यांग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, गाेवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात कुठल्याच दिव्यांग तसेच वरिष्ठ व्यक्तींना लागणाऱ्या उपकरणांसाठी वंचित राहू नये यासाठी हे दिव्याशा केंद्र आहे. यात त्यांना लागणारे व्हीलचेअर, ऐकायला येणारे कानाचे मशीन, दृष्टीचे मशीन, तसेच इतर दिव्यांगांना लागणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. यासाठी या वस्तू लागणाऱ्या लोकांना केंद्राकडे अर्ज करावे लागणार आहे. लवकरच त्यांना ही उपकरणे मिळणार आहेत. आता त्यांना पैसे माेजण्याची तसेच ताटकळत वाट पाहण्याची गरज भासणार नाही. एएलआयएमसीओ या कंपनीमार्फत सरकारने हा पुढाकार घेतला आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी काही दिव्यांग व्यक्तीला कानाचे मशीन, व्हीलचेअर तसेच इतर वस्तूही दिल्या. पर्पल फेस्टिव्हलच्या निमित्ताने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे देशातील ४६ वे केंद्र आहे. तर, राज्यातील पहिले केंद्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा