शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा, पोलिसांविरुद्धही गुन्हे नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 13:32 IST

गोव्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर स्थिती नव्याने निर्माण झालेली आहे. मुरगाव तालुक्यात टॅक्सी चालकाने महिलेवर बलात्कार करणे, ज्येष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करू त्यांच्या घरातील लाखोंचे सोने व रोख रक्कम लुटून नेणे, काणकोणमध्ये एका पोलिसाने सरपंचाच्या हाताचा चावा घेणे, पेडण्यात पर्यटकाला पोलिसाने बेदम मारहाण करणे व मग पोलिसाला अटक होणे असे अनेक गुन्हे घटण्याचे सत्रच गोव्यात सुरू आहे.

पणजी : गोव्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर स्थिती नव्याने निर्माण झालेली आहे. मुरगाव तालुक्यात टॅक्सी चालकाने महिलेवर बलात्कार करणे, ज्येष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करू त्यांच्या घरातील लाखोंचे सोने व रोख रक्कम लुटून नेणे, काणकोणमध्ये एका पोलिसाने सरपंचाच्या हाताचा चावा घेणे, पेडण्यात पर्यटकाला पोलिसाने बेदम मारहाण करणे व मग पोलिसाला अटक होणे असे अनेक गुन्हे घटण्याचे सत्रच गोव्यात सुरू आहे.गोवा विधानसभा अधिवेशन येत्या 19 पासून सुरू होत आहे. विरोधी काँग्रेस पक्ष त्यावेळी ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार आहेच. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकतीच वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक घेतली. मटका जुगार व अन्य गैरव्यवहारांविरुद्ध कारवाई केली जावी. तसेच पोलीस बंदोबस्त काही भागांमध्ये वाढविला जावा, अशा सूचना गृह खाते सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना केल्या आहेत. त्यानंतर लगेच गोव्याच्या किनारी भागातील मोरजी येथे पोलिसांनी एक मोठा छापा टाकला व त्या छाप्यात मटका अड्ड्यावर 60 लाख रुपये रोख स्वरुपात सापडले. पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. सरकारने मुक्तपणे कारवाई करण्याची मुभा दिल्यानेच एका मटका अड्ड्याविरुद्ध पोलीस कारवाई करू शकले. मात्र राज्यभर असे अनेक अड्डे सुरू असल्याची चर्चा अनेक आमदारांमध्ये सुरू आहे.राज्यातील वाढत्या अंमली पदार्थ व्यवहारांविरुद्धही जोरदार चर्चा सुरू आहे. आम्ही सगळेच अंमली पदार्थ व्यवहारांना पायबंद घालण्यात अपयशी ठरल्याचे खुद्द पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीच सोमवारी पणजीत पत्रकारांशी बोलताना नमूद केले. मटका जुगारापेक्षाही गोव्यात अंमली पदार्थ विक्रीचा धंदा ही फार मोठी व गंभीर गोष्ट असल्याचे मंत्री आजगावकर म्हणाले. गोव्यातील वाढत्या ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनीही चिंता व्यक्त केली.गोवा हे पर्यटन राज्य आहे. या राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणे हे पर्यटन व्यवसायाच्या हिताचे नाही. एका टॅक्सी चालकाने महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीस अटक करण्यात यश मिळविले. त्यानंतर लगेच गिरदोली-चांदोर येथे चोरट्यांनी एका घरातील ज्येष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करून त्यांच्या घरातील ऐवज लुटण्याची घटना घडली. या प्रकरणीही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पेडण्यात सोमवारी एका पर्यटकाला पोलिसाने व त्या पोलिसाच्या मित्राने मिळून बेदम मारहाण केली. याबाबत पोलिसाला अटक झाली आहे. गेल्या चार दिवसांत दोघा पोलिसांना दोन वेगवेगळ्य़ा गुन्ह्यांत अटक झाली आहे.