शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मगोपच्या तिन्ही आमदारांची पक्षासोबत बैठक, एकत्र असल्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:25 IST

मगो पक्षाचे तिन्ही आमदार व मगो पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची सोमवारी बैठक झाली. आमदार एकत्र आहेत अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. तसेच एकत्रितपणे छायाचित्रही काढून घेतले गेले.

पणजी  - मगो पक्षाचे तिन्ही आमदार व मगो पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची सोमवारी बैठक झाली. आमदार एकत्र आहेत अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. तसेच एकत्रितपणे छायाचित्रही काढून घेतले गेले.

मगो पक्ष शिरोडा मतदारसंघात भाजपविरुद्ध विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहे. यामुळे मगोपला सत्तेतून दूर केले जावे, अशी गोवा फॉरवर्ड पक्षाची अपेक्षा होती. पण मगोपला सत्तेतून दूर केले तर येत्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपची दक्षिण गोव्यातील जागा धोक्यात येईल, याची कल्पना भाजपने फॉरवर्डच्या काही नेत्यांना दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले. बाबूश मोन्सेरात यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यावेळी मंत्री व मगोपचे नेते बाबू आजगावकर हे रविवारी रात्री दोनापावल येथे गेले होते. त्यांच्यासोबत मगोपचे सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पाऊसकर हेही होते. तिथे फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई, आरोग्य मंत्री विश्वजित राणे व मोन्सेरात हेही बराचवेळ एकत्र बसले. राजकीय विषयांवर चर्चा झाली. यामुळे मगोप फुटेल अशा प्रकारची अफवा नव्याने पसरली.

मगोपचे नेते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी दुपारी आल्तिनो येथे बैठक घेतली. त्या बैठकीत मंत्री आजगावकर, आमदार पाऊसकर, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि कार्याध्यक्ष नारायण सावंत हे सहभागी झाले. प्राप्त राजकीय स्थितीत राज्यात काहीही घडू शकते, पर्रीकर हे अत्यंत आजारी असल्याने आम्ही कोणत्याही राजकीय प्रसंगाला संघटीतपणे तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, असे त्या बैठकीत ठरल्याचे पक्ष सुत्रांनी सांगितले.आपण कोणत्याच स्थितीत मगोपला सोडून अन्य कुठेच जाण्याचा विचार देखील करू शकत नाही, असे पाऊसकर यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीनंतर दीपक ढवळीकर यांनी पत्रकारांना सांगितले, की मगोपला कुणी फोडण्याचा प्रश्नच येत नाही. मगोपचे तिन्ही आमदार संघटीत आहेत. बैठकीत प्रत्येकाने स्वत:च्या भावना व्यक्त केल्या व संघटीत रहावे असे ठरले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण