शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ

By पंकज शेट्ये | Updated: April 29, 2024 16:34 IST

दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचे आले ई मेल

पंकज शेट्ये, लोकमज न्यूज नेटवर्क, वास्को: गोव्याच्या दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल विमानतळ प्राधिकरणाला आल्यामुळे सोमवारी (दि.२९) दुपारी दोन्ही विमानतळावर खळबळ उडाली. ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्यानंतर दोन्ही विमानतळावर सर्व सुरक्षा यंत्रणांनी कडक रित्या तपासणी केली असता सर्वकाही सुरक्षित असल्याचे आढळून आले. दरम्यान दोन्ही विमानतळावरील विमानसेवेत कुठल्याच प्रकारचा विलंब न होता प्रवासी विमानांची वाहतूक वेळेनुसार होत असल्याची माहीती प्राप्त झाली.

सोमवारी दुपारी विमानतळ प्राधिकरणाला दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर आणि उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आला. ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने दोन्ही विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना त्वरित त्याबाबत माहीती दिली. ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावरील सर्व परिसराची आणि तेथे येणाऱ्या प्रवासी इत्यादींची कडकरित्या तपासणी केली. दोन्ही विमानतळावर कडक रित्या तपासणी केली असता ‘बॉम्ब’ बाबत आलेले ते ई मेल खोटी अफवा पसरविण्यासाठी आल्याचे उघड झाले.

अधिक माहीतीसाठी दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांना संपर्क केला असता दाबोळी विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्याच्या माहीतीला त्यांनी दुजोरा दिला. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण दाबोळी विमानतळावर कडकरित्या तपासणी केली असता सर्व काही सुरक्षित असल्याचे आढळून आल्याची माहीती त्यांनी दिली. त्या ई मेल मुळे प्रवासी विमान वाहतूकीला कुठल्याच प्रकारचा विलंब झाला नसून सर्व विमाने प्रवाशांना घेऊन वेळेवरच निघाली आणि उतरली अशी माहीती धनंजय राव यांनी दिली. ‘बॉम्ब’ बाबत आलेले ई मेल खोटी अफवा पसरवण्यासाठी आल्याचे उघड झाले असून ते कोणी पाठवले त्याबाबतही चौकशी चालू असल्याची माहीत विमानतळावरील सूत्रांकडून मिळाली. ई मेल खोटी अफवा पसरविण्यासाठी आल्याचे एकंदरीत उघड झाले असलेतरी दोन्ही विमानतळावर संध्याकाळ पर्यंत कडकरित्या तपासणी केली जात असल्याची माहीती मिळाली.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ