शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

मनाने मवाळ असलो तरी वेळप्रसंगी कणखर निर्णयही घेतले- दिगंबर कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 19:04 IST

मुख्यमंत्री असताना मला विरोध मवाळ मुख्यमंत्री म्हणायचे. आताही मी मवाळ विरोधी पक्षनेता अशी टीका माझ्यावर होते.

 

मडगाव: मुख्यमंत्री असताना मला विरोध मवाळ मुख्यमंत्री म्हणायचे. आताही मी मवाळ विरोधी पक्षनेता अशी टीका माझ्यावर होते. मी जरी मनाने मवाळ असलो तरी वेळप्रसंगी कणखर निर्णयही घेऊ शकतो हे मी मुख्यमंत्री असताना गोव्यातील सेझ प्रकल्प रद्द करून दाखवून सिद्ध केले होते. मंजुर झालेले सेझ प्रकल्प रद्द करणारा मी देशातील एकमेव मुख्यमंत्री होतो, असे दिगंबर कामत यांनी बोलून दाखविले.  13 डिसेंबर रोजी कामत यांनी आपल्या आमदारकीची 25 वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांचा शुक्रवारी एक छोटेखानी सत्कार केला. त्यावेळी बोलाना काहीसे भावुक झालेल्या कामत यांनी या कार्यकर्त्यांच्याच पाठिंब्यामुळे आपण ही मजल मारू शकलो म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आणि मडगाववासीयांना धन्यवाद दिले. मडगावकरांना मी त्यांच्यासाठी आणखीही हवा आहे हे या सत्काराने दाखवून दिले आहे, असेही सूचक उद्गार त्यांनी काढले.10 डिसेंबर 1994 रोजी दिगंबर कामत पहिल्यांदा मडगावातून आमदार म्हणून निवडून आले होते. यासंबंधीची अधिकृत अधिसूचना 13 डिसेंबर 1994 रोजी जारी झाली होती. त्यामुळे अधिकृतरित्या काल 13 डिसेंबरला त्यांनी आपल्या आमदारकीची 25 वर्षे पूर्ण केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, काही विरोधक माझ्यावर मी मडगावसाठी काहीच केले नाही अशी टीका करतात. मात्र मी त्या टीकेची पर्वा करीत नाही. मी काय केले आहे ते सर्व मडगावकरांना माहीत आहे. त्यामुळेच मागची 25 वर्षे ते मला निवडून देत आहेत. सामान्य मडगावकराला चांगले दिवस येणे हाच माझ्या  दृष्टीने सर्वात मोठा विकास असल्याचे ते म्हणाले.कुणाशीही भांडण करण्याचा आपला स्वभाव नाही त्यामुळे आक्रस्ताळेपणा करूनच विरोध करता येतो हे मला अजिबात मान्य नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रस्ताळेपणा कधीही करणार नाही. असे जरी असले तरी काँग्रेसला परत गोव्यात सत्ता मिळावी यासाठी माझे प्रयत्न चालूच राहणार आहेत आणि एक दिवस ही सत्ता पुन्हा काँग्रेसकडे येईल याची आपल्याला पूर्ण खात्री असल्याचेही ते म्हणाले. शुक्रवारी कामत यांची विविध स्तरातील व्यक्तींनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यात स्वातंत्र्य सैनिक, काँग्रेसचे कार्यकर्ते, मडगावचे व्यापारी, मडगावचे नगरसेवक तसेच त्यांच्य अन्य समर्थकांचा समावेश होता. यावेळी मडगावच्या नगरसेवकांनी त्यांना फळांची परडी भेट दिली. या कार्यकर्त्यांनी आणलेला केक कामत यांनी आपली नात राधा हिच्यासह कापून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या पत्नी आशा, पुत्र योगीराज व सून नेहा हेही उपस्थित होते.