शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मगोप सोडलेल्यांना पुन्हा प्रवेश किंवा तिकीटदेखील देणार नाही: सुदिन ढवळीकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:11 IST

पक्षाच्या आमसभेने आधीच निर्णय घेतल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश नाही तसेच निवडणुकीसाठी तिकीटदेखील दिले जाणार नाही, असा कडक निर्णय मगोपच्या आमसभेने याआधी घेतलेला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

याबाबत पत्रकारांच्या एका प्रश्नावर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, '२००७ नंतर हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. काहीजण पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येतात व पक्षाला बाधक वक्तव्ये करतात व नंतर पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करतात. आम्ही तिकीट देऊन निवडून आणतो व नंतर ते पक्ष सोडून जातात, हे यापुढे चालणार नाही. आमसभा जो निर्णय घेते तो मी किंवा पक्षाचा अध्यक्षही बदलू शकत नाही'

ढवळीकर म्हणाले की, 'आणखी एक महत्त्वाचा निर्णय आमसभेने घेतला आहे, तो म्हणजे मगोपच्या तिकिटावर प्रथमच आमदार म्हणून निवडून येणाऱ्याने पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद मागू नये. प्रथमच निवडून येणाऱ्याने एखादे महामंडळ स्वीकारावे. इतर काही गोष्टी शिकाव्यात, असा पक्षाचा आग्रह आहे. तर काही करता येते.'

... पक्ष सोडायला नको होता

सुदिन ढवळीकर म्हणाले की, 'मी केवळ मगोपबद्दलच बोलतोय असे नव्हे तर अन्य पक्षातही असे काही नेते आहेत, जे पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन मुख्यमंत्री बनले व नंतर त्यांनी पक्ष सोडला.' लक्ष्मीकांत पार्सेकर व दिगंबर कामत यांच्या नावांचा उल्लेख करून ढवळीकर म्हणाले की, 'या दोघांनी पक्ष सोडायला नको होता, असे माझे वैयक्तिक मत आहे. मगोपतून असे अनेकजण गेले, खास करून चांगले नेते गेले. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.'

प्रत्येकाला नशीब आजमावण्याचा अधिकार : कामतांचा विजयला टोला

'नशीब आजमावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे', अशी प्रतिक्रिया आमदार दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सुरू केलेल्या 'जनता दरबार'वर दिली. आमदार सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी 'जनता दरबार' घेतले आहेत. आतापर्यंत त्यांनी पेडणे, म्हापसा, डिचोली, काणकोण येथे दरबार घेतले आहेत.दरम्यान, मडगाव पालिका निवडणुकीत केवळ फातोर्थ्यातच नव्हे, तर मडगावातील प्रभागांमध्येही आपण उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. २०२७ च्या विधानसभेवेळी गोवा फॉरवर्ड मडगावमधूनही लढू शकतो, असे भाष्य अलीकडेच विजय यांनी केल्याने दिगंबर व त्यांचे शत्रुत्व आणखी वाढले आहे.कामत म्हणाले की, 'कोणी कोणालाही अडवू शकत नाही. उद्या मला जनता दरबार भरवावा असे वाटले तर मी तो भरवीन. सर्वांनाच नशीब आजमावण्याचा अधिकार आहे. निवडणुकीला बरेच दिवस आहेत.' 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण