शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

....हा तर भाजप सरकार पुरस्कृत ‘अर्बन नक्षलवादा’चा बळी;  विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचा हल्लाबोल

By किशोर कुबल | Updated: January 1, 2024 13:19 IST

कामांची  निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

पणजी : स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणामुळे मळा येथे खड्ड्यात पडून माजी नगरसेवकाचा पुत्र आयुष हळर्णकर (२१) हा ठार झाल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी तीव्र संताप व्यक्त करताना हा भाजप सरकार पुरस्कृत ‘अर्बन नक्षलवादा’चा बळी असल्याचे म्हटले आहे.

युरी म्हणाले कि,‘सरकारच्या घोर निष्काळजीपणामुळे आणि उद्धटपणामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका कुटूंबात अंधार पसरला. आजपावेतो स्मार्ट सिटीने दोन बळी घेतले. आता कारणे देणे थांबवा आणि बेजबाबदार असलेल्यांवर कारवाई करा. या घटनेस जबाबदार असलेल्या सर्वांवर त्वरित कारवाई व्हायला हवी. युरी पुढे म्हणाले कि,‘ राजधानी शहरातील पीपल्स हायस्कूलजवळील असुरक्षित व उघडे ठेवलेल्या खड्ड्यांचा पर्दाफाश दोनच दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांनी केला होता. परंतु बेजबाबदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कारभाराने हा मृत्यू झाला.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा जो बोजवारा उडाला आहे त्याला कारणीभूत असलेल्या ‘अर्बन नक्षलवाद्यां’ची नावे जाहीर करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का? दोघांचे जीव घेणाऱ्या, अनेकांना जखमी करणाऱ्या आणि शेकडो  वाहनांचे नुकसान करणाऱ्या  दोषींवर सरकारने आजपर्यंत काय कारवाई केली, हे मुख्यमंत्री उघड करतील का? आदी सवाल युरी आलेमाव यांनी केले आहेत.

कामांची  निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी          स्मार्ट सिटी आणि अमृत मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करताना युरी यांनी असेही म्हटले आहे की, ‘सरकारने जर माझी मागणी  नाकारली तर या कामातील भ्रष्टाचार हा भाजप सरकारच्या आशीर्वादाने झाला असल्याचा आमचा दावा खरा ठरेल.’