शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हा आंतरराष्ट्रीय नव्हे, देशी चित्रपट महोत्सव; विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांची जोरदार टीका

By किशोर कुबल | Updated: November 1, 2023 13:05 IST

- श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

पणजी : गोव्यात होणाय्र इफ्फीच्या आयोजनावर  टिकेची झोड उठवताना विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यानी हा आंतरराष्ट्रीय नव्हे, देशी चित्रपट महोत्सव असल्याचे म्हटले आहे. श्वेतपत्रिका काढून दरवर्षी होणाऱ्या अवाढव्य  खर्चाच्या तुलनेत  इफ्फीचा गोव्याला काय फायदा झाला, हे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या चार वर्षांत इफ्फीसाठी केवळ २६९ विदेशी प्रतिनिधींची नोंदणी झाली.  गोवा सरकारकडून सुमारे  १०० कोटी खर्च झाला. केंद्राकडून ११.८ कोटींचे नगण्य अर्थसहाय्य गोवा सरकारला मिळाले आणि इफ्फीच्या अधिकृत विभागात गोव्याचा फक्त एक चित्रपट प्रदर्शित झाला, अशी आकडेवारीच युरी यांनी दिली आहे.ते म्हणाले कि, ‘आकडेवारी जाहीर करण्याचे माझे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले नाही त्यामुळे मला  ही आकडेवारी सार्वजनिक करणे भाग पडले आहे.’

इफ्फीचे अधिकार आता गोवा सरकार अथवा मनोरंजन संस्थेकडे राहिले नसून, केवळ निवास व वाहतूक व्यवस्था सांभाळणे एवढीच जबाबदारी गोवा सरकारकडे आहे.  ते म्हणाले कि,‘ २०१९ साली झालेल्या ५० व्या इफ्फीला केवळ ११६ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी झाले, तर २०२१ मधील ५१ व्या इफ्फीत केवळ ३३ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.  २०२२ मधील ५२ व्या इफ्फीसाठी ३७ विदेशी प्रतिनिधींनी नोंदणी केली  तर ५३  व्या इफ्फीत केवळ ८३ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारनेच दिलेल्या  माहितीवरुन २०१९ ते २०२२ पर्यंत इफ्फीसाठी नोंदणी करणाऱ्या एकूण प्रतिनिधींची संख्या केवळ २२,००३ होती. त्यापैकी ६४८० गोमंतकीय होते.

मागील चार इफ्फींसाठी सरकारला फक्त ४.५ कोटींचे प्रायोजकत्व मिळू शकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इफ्फीच्या ५० व्या आवृत्तीचे प्रमुख प्रायोजक हे गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि माहिती तंत्रज्ञान हे सरकारी विभाग होते.  सुवर्ण महोत्सवी आवृत्तीसाठीसुद्धा सरकारला कोणतेही खाजगी प्रायोजक मिळू शकले नाहीत.

५३ व्या इफ्फीत भारतीय पॅनोरमाच्या अधिकृत विभागात राजेश पेडणेकर निर्मित आणि साईनाथ उसकईकर  दिग्दर्शित “वाग्रो” हा एकच लघू चित्रपट निवडला गेला. गोवा फिल्म फायनान्स योजना २००६ मध्ये काँग्रेस सरकारने सुरू केली होती. दुर्दैवाने, गोवा मनोरंजन संस्थेने सदर योजना २०१२ ते २०१६ या काळात बासनात गुंडाळून ठेवली. आजपर्यंत या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या ३५ चित्रपटांपैकी जवळपास ७५ टक्के चित्रपटांची निर्मिती  काँग्रेस सरकारच्या काळात झाली होती, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.