शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पापूर्वी लोकांचा विचार करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:51 IST

वाघांचे संरक्षण व्हायलाच हवे. जंगलांच्याही रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण वाघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा की आणखी काय करावे ते अभ्यासाअंती ठरवू.

पणजी - गोव्यात व्याघ्र संरक्षण प्रकल्प राबविण्याची शिफारस केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाच्या चौकशी पथकाने यापूर्वी केली आहे पण गोवा सरकारने असा प्रकल्प राबविण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.म्हादई अभयारण्यात चार वाघांची हत्त्या झाल्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने चौकशी पथक गोव्यात पाठवले होते. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणातील अधिका-यांच्या त्या पथकाने गोव्यातील वाघांच्या संरक्षणाविषयी नुकताच अहवाल दिला. गोवा म्हणजे वाघांसाठी मृत्यूचा सापळा बनू नये व त्यासाठी व्याघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा अशी शिफारस अहवालातून केली गेली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी बुधवारी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की अजून अधिकृतरीत्या गोवा सरकारकडे हा अहवाल आलेला नाही. वन मंत्रलयाकडून अहवाल मागू घ्या अशी सूचना मी वरिष्ठ अधिका:यांना केली आहे. प्रसार माध्यमांना अहवाल मिळाला पण सरकारकडे अजून अधिकृत प्रत मिळालेली नाही. आम्ही तो अहवाल वाचू व त्यानंतर वाघ संरक्षणाविषयी काय करता येईल ते पडताळून पाहू.मुख्यमंत्री म्हणाले, की वाघांचे संरक्षण व्हायलाच हवे. जंगलांच्याही रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गोव्यात 34 टक्के वन क्षेत्र आहे याचा आम्हाला अभिमान आहे पण वाघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा की आणखी काय करावे ते अभ्यासाअंती ठरवू. अहवालातून शिफारस करणो सोपे असते पण जंगलात लोकही राहतात याचाही विचार करावा लागतो. त्या लोकांचाही विचार सरकारला करावा लागतो. वाघांच्या रक्षणाविषयी विविध शक्यता आम्ही पडताळून पाहू.दरम्यान, अभयारण्यांमध्ये जे लोक राहतात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सरकार करील असे मुख्यमंत्र्यांनी पणजीत वन भवनाचे बुधवारी उद्घाटन केल्यानंतर सांगितले. अभयारण्यांमध्ये ट्रेकिंगसाठी काही जागा सरकारने निवडल्या आहेत. तिथे ट्रेकर्सना ट्रेकिंगसाठी जाऊ दिले जाईल. औषधी वनस्पती किंवा औषधी पाळेमुळे किंवा बिया जे गोळा करतात, त्यांची नोंदणी सरकार करून घेईल. त्यांना परवाना दिला जाईल व मग त्यांना अभयारण्यांमध्ये जाता येईल. बिया, वनस्पती वगैरे गोळा करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघgoaगोवा