शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

चोरांकडून सासू-सुनेचा खून

By admin | Updated: January 31, 2015 02:33 IST

वास्कोतील घटना : दुसरी सून गंभीर जखमी; मांगोर हिल येथील फ्लॅटमध्ये चोरी, तपासासाठी विशेष पथक

वास्को : दरोडे व चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने चोरटे मुजोर बनले असून वास्कोत एका फ्लॅटमधील ऐवज लंपास करताना चोरांनी सासू-सुनेचा गळा दाबून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत दुसरी सून गंभीर जखमी झाली असून वास्कोतील रहिवाशांत घबराट पसरली आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू असल्याने चोरीच्या ऐवजाचा तपशील मिळालेला नाही. राज्यात गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: दक्षिण गोव्यात चोरट्यांचा उच्छाद वाढला असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मांगोर हिल-वास्को येथील श्री कामत पॅलेस को आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये गुरुवारी उत्तररात्री झालेल्या जबरी चोरीत दोन महिलांना जीव गमवावा लागला. सिद्धार्थ नामदेव नाईक यांच्या मालकीच्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये चोरांनी प्रवेश करून सासू (उषा नामदेव नाईक, ५८) व एका सुनेचा (नेहा सिद्धार्थ नाईक, २८) गळा दाबून खून केला, तर दुसऱ्या सुनेला प्रतिमा प्रवीण नाईक (वय २६) मारहाण करत ऐवज लांबवून पोबारा केला. जखमीवर चिखलीतील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या मारहाणीत प्रतिमाकडे असलेल्या नेहाच्या सहा महिन्यांच्या मुलीला कोणतीही इजा झाली नाही. शुक्रवारी पहाटे ४ वाजता सोसायटीमधील अभय गजानन पाटील यांनी वास्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. या संदर्भात पाटील यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास प्रतिमा नाईक जखमी अवस्थेत सहा महिन्यांच्या पुतणीसह आरडाओरड करत फ्लॅटमधून खाली आल्या. त्यांनी काही फ्लॅटधारकांची दारे ठोठावून जागे केले व आपल्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे सांगितले़ सोसायटीचे पदाधिकारी श्रीनिवास राव व चिटणीस बाबूराव अनंत नाईक यांनी आत जाऊन पाहिले असता, त्यांना उषा नाईक या बाहेरील हॉलमध्ये, तर वरच्या माळ्यावर असलेल्या बेडरुममध्ये नेहा नाईक बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्याचे आढळले़ तसेच बेडरुम व स्वयंपाकघराच्या बाजूला असलेली दोन कपाटे उघडी असल्याचे व त्यातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्तपणे जमिनीवर टाकल्याचे दिसून आले़ त्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना तसेच १०८ रुग्णवाहिकेला कल्पना दिल्यावर रुग्णवाहिकेतील परिचारकाने बेशुद्धावस्थेत असलेल्या सासू-सुनेची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर वास्को पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निखील पालयेकर यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवून दिले़ दोन्ही मृतदेहांवर कसल्याही जखमा नसल्याने त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला असावा, असा कयास आहे. उषा नाईक या नेहा सिद्धार्थ नाईक या सुनेसह या फ्लॅटमध्ये राहत होत्या. दुसरी सून प्रतिमा नाईक हीसुद्धा अधूनमधून या फ्लॅटमध्ये राहते़ उषा हिचे सिद्धार्थ व प्रवीण हे दोन्ही मुलगे विदेशात जहाजावर कामाला असतात़ सध्या सिद्धार्थ फिलिपीन्स येथे, तर प्रवीण अमेरिकेत असून दोघांनाही या घटनेची पोलिसांनी तसेच नातेवाईकांनी माहिती दिली आहे. हल्ल्याबाबत माहिती कळताच गोवा पोलीस खडबडून जागे झाले असून पणजी मुख्यालयातील सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ तसेच काही पोलीस स्थानकांवरील निरीक्षकांनाही घटनास्थळी बोलावून तपासकामात मदत घेण्यात येत आहे़ पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग, उपमहानिरीक्षक व्ही़ रंगनाथन, अधीक्षक कार्तिक कश्यप, उपअधीक्षक सुभाष गोलतेकर, मोहन नाईक, रवी देसाई, सिद्धांत शिरोडकर, संदेश चोडणकर, विश्वेश कर्पे, व्ही़ वेळुसकर आदी अधिकारी उपस्थित होते़ या सर्वांनी एकत्रितपणे या हल्ल्याचा तपास करण्याबाबत पावले उचलली आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी दिली. तीन निरीक्षक या पथकात असून एक महिला निरीक्षकही आहे. गुन्हा शाखाही या बाबतीत तपास करीत आहे, असे त्यांनी सांगितले. या घरातील पुरुष विदेशात नोकरीला असल्याने ते परतल्यानंतरच अधिक माहिती मिळू शकेल, असे गर्ग म्हणाले. (प्रतिनिधी)