शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणावरून भंडारी समाजात फुटू देणार नाही- अशोक नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:16 IST

समाज एकसंध ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक नाईक यांनी म्हटलं.

पणजी: गोव्याच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा असलल्या गोमंतक भंडारी समाजात यापुढे राजकीय मुद्यांवरून फूट पडू देणार नाही, अशी घोषणा असे या समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक कृष्णा नाईक यांनी केली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून समाज एकसंध राखणे आणि समाजाचा विकास करणे हे उद्दिष्ट ठेऊन काम करणार असल्याचे त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

भंडारी समाजाच्या राज्य कार्यकारणीची निवडणूक नुकतीच पार पाडून अशोक नाईक हे या समाजाचे अध्यक्ष झाले. प्रबळ उमेदवार असलेले अनिल होबळे यांचा त्यांनी ७८ मतांनी पराभव केला. लोकमतशी संवाद साधताना ते म्हणाले की, समाज एकसंध राखणे हे ब्रीद राहील  आणि सर्वांना सोबत घेऊन एकत्रपणे काम करणे हेच आपले तंत्र राहील. पक्षीय राजकारणाला बळी पडून समाजाचे विघटन होवू देणार नाही. समाजाच्या एका झालेल्या व्यापक बैठकीतही तसा निर्णय घेण्यात अला आहे. भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार दामू नाईक, दयानंद मांद्रेकरही आमचेच आहेत आणि काँग्रेसमध्ये असलेले आमदार रवी नाईकही आमचेच आहेत. 

गोव्यात ४.५ लाख लोक हे भंडारी समाजाचे घटक आहेत.  समाजातील लोकांची शीरगणती करण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यामुळे समाजासाठी विकासाचे उपक्रम हाती घेण्यासाठी ते सोयीचे होईल. विशेषत: शिक्षणाच्या बाबतीत या समाजाची जी प्रगती झालेली आहे ती पुरेशी नाही. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी बरेच काही करण्यासारखे आहे. माझे कार्यकारणी सदस्य व समाजबांधवाच्या मदतीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. गोव्याच्या १४.५ लाख लोकसंख्येत भंडारी समाजाचे प्रमाण हे २७ टक्क्यांहून अधिक आहे. गोव्याच्या राजकारणातही या समाजाची छाप आहे. या समाजाचे घटक असलेले श्रीपाद नाईक हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आयुश मंत्री आहेत. तसेच सध्या काँग्रेसचे आमदार असलेले रवी नाईक हे या समाजातून मुख्यमंत्री झालेले एकमेव नेते आहेत. 

टॅग्स :goaगोवा