शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेन्टिनल्सच्या फोटोंचा गैरवापर झाल्याची एकही तक्रार नाही- पोलीस महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 19:33 IST

वाहतूक नियम मोडणा-यांविरोधात सेन्टिनल्सच्या माध्यमातून दंड देण्याच्या सुरू केलेल्या कारवाईला गोव्यातील विविध स्तरांतून विरोध होत असतानाच सेन्टिनल्सद्वारे मुलींचे फोटो काढून त्यांचा गैरवापर केला जातो

मडगाव: वाहतूक नियम मोडणा-यांविरोधात सेन्टिनल्सच्या माध्यमातून दंड देण्याच्या सुरू केलेल्या कारवाईला गोव्यातील विविध स्तरांतून विरोध होत असतानाच सेन्टिनल्सद्वारे मुलींचे फोटो काढून त्यांचा गैरवापर केला जातो असाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी मानवाधिकार आयोगाला लिहिलेल्या पत्रात वाहतूक सेन्टिनल्सद्वारे मुलींचे फोटो घेऊन त्या फोटोंचा गैरवापर केला जातो, असा आरोप जरी केला जात असला तरी अशाप्रकारची एकही तक्रार आतापर्यंत पोलिसांकडे दाखल झालेली नाही, असा खुलासा गोवा पोलिसांतर्फे करण्यात आला आहे.युवतींच्या मान्यतेशिवाय सेन्टिनल्सद्वारे फोटो घेऊन त्यांच्या मानवाधिकारांचा भंग केला जातो असा दावा करून मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारीसंदर्भात आयोगाने मुख्य सचिव, वाहतूक सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून अहवाल मागितल्याच्या पार्श्वभूमीवर महासंचालक मुक्तेश चंदर यांनी आयोगाला पाठविलेल्या उत्तरात वरील गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. या व्यवस्थेच्या विरोधात काही आमदारांनी आक्षेप घेतले असले तरी ते आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नसून केवळ ऐकीव माहितीवर असल्याचे पोलिसांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.सेन्टिनल्सद्वारे घेतले जाणारे फोटो वेश्या व्यवसायातील दलालांना पुरविले जातात असा आरोप काही आमदारांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही नोटीस पाठविली होती. या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट करताना ट्रॅफीक सेन्टिनल अ‍ॅपद्वारे जे फोटो घेतले जातात ते थेट पोलीस यंत्रणोकडे पोहोचतात. हे फोटो कुठल्याही फोनच्या गॅलरीवर स्टोअर होत नाहीत याकडेही लक्ष वेधले आहे. या अ‍ॅपद्वारे घेतलेले फोटो थेट सर्व्हरवर अपलोड होत असल्याने त्याचा गैरवापर होणे शक्य नाही, असेही या उत्तरात म्हटले आहे.सेन्टिनल्सद्वारे घेतले जाणा-या मुलींच्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे असा जरी आरोप केला जात असला तरी घेतले जाणारे फोटो बहुतेक मागच्याबाजूने घेतले जातात त्यामुळे या फोटोंचा गैरवापर होणो शक्य नाही. एवढेच नव्हे तर सामाजिक सहकार्याशिवाय कुठल्याही यंत्रणोला आपले काम प्रभावीरित्या करता येत नाही. वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठीही अशा सामाजिक सहकार्याची नितांत गरज आहे याकडेही चंदर यांनी आपल्या उत्तरातून लक्ष वेधले आहे.