मडगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी महागठबंधनसाठी काँग्रेसचे काही नेते प्रयत्नशील असले तरी या गठबंधनासाठी काँग्रेस पक्ष गंभीर नाही. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी युतीसाठी गोव्यात किती पक्ष शिल्लक आहेत, अशी विचारणा गुरुवारी मडगावात पत्रकार परिषदेत केली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकला चलोच लढेल, असे संकेत त्यांनी दिले. या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना पक्ष संधी देईल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. युतीसाठी गोव्यात कोणता पक्ष शिल्लक आहे, असा फालेरोंचा पत्रकारांना प्रश्न होता. मगोचा भाजपाकडे हनिमून सुरू आहे. गोवा विकास पक्षही भाजपाशी युती करून आहे. वेळ्ळी, पर्वरी व डिचोली येथील अपक्ष उमेदवारही सत्ताधारी पक्षाशीच बाजू घेणारे आहेत. त्यामुळे बोलणार तरी काय, असे फालेरो उद्गारले. युगोडेपाबद्दल विचारले असता हा पक्ष आहे का, असे हसून ते म्हणाले. अनेक युवक काँग्रेस पक्षात येण्यास उत्सुक आहेत. त्यांना पक्षात घेतलेही जात आहे. गट विकास समिती स्थापन केली जात आहे. तेथे युवा वर्गांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जात आहे. येत्या निवडणुकीत (पान २ वर)
महायुतीसाठी पक्षतरी शिल्लक आहेत का?
By admin | Updated: November 13, 2015 02:17 IST