शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर मी साहित्य संमेलनाचे निमंत्रणच नाकारले असते’ -ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 06:25 IST

गोव्यात अनेक वर्षे मराठी विरुद्ध कोंकणी असा वाद सुरू आहे. १९८७ साली उफाळलेल्या वादावेळी काहींचे बळीही गेले. गोव्यात मराठी राजभाषा नको, अशी भूमिका ज्या कोंकणी लेखकांनी घेतली त्यात मावजो यांचाही समावेश होतो.

सदगुरू पाटील -

पणजी : मी मराठीद्वेष्टा नाही. उलट मला मराठी भाषेविषयी जास्तच आदर आहे. मी मराठीद्वेष्टा असतो तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले असते, असे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गोमंतकीय लेखक दामोदर मावजो यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी सांगितले. गोव्यात अनेक वर्षे मराठी विरुद्ध कोंकणी असा वाद सुरू आहे. १९८७ साली उफाळलेल्या वादावेळी काहींचे बळीही गेले. गोव्यात मराठी राजभाषा नको, अशी भूमिका ज्या कोंकणी लेखकांनी घेतली त्यात मावजो यांचाही समावेश होतो. यामुळेच मावजो यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यास मराठी चळवळीतील काहींचा विरोध आहे. मावजो म्हणाले, मला गोव्यातील मराठीवाद्यांपैकी सगळेच विरोध करत नाहीत. त्यांना कावीळ झालेली आहे. मला ते विरोध का करतात हेच कळत नाही. मी साहित्यातून कोंकणीची सेवा केली. मला कोंकणी लेखक या नात्याने संमेलनात बोलावले गेलेले नाही तर एक भारतीय भाषांमधील लेखक व ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला लेखक या नात्याने निमंत्रित केले आहे. यावेळी माझी निवड झाली, ती केवळ कोंकणी म्हणून नव्हे. कथासंग्रहाला मराठी प्रस्तावना -मावजो म्हणाले की, मला मराठीविषयी एवढा आदर आहे की, मी माझ्या कोंकणी कथासंग्रहात देखील मराठी प्रस्तावना छापलेली आहे. माझ्याकडे आलेली मराठीतील प्रस्तावना कोंकणीत अनुवादित करून छापू या असे प्रकाशकाने सुचविले होते. पण मी मराठीतच छापण्याचा निर्णय घेतला.

मी मराठी साहित्याचे जेवढे वाचन व अभ्यास केला आहे, त्याच्या दहा टक्केही  गोव्यातील काही मराठीवाद्यांनी केलेला नाही. मी त्यांना आव्हान देतो, की त्यांनी दहा टक्के तरी अभ्यास व वाचन केले असल्याचे मला दाखवून द्यावे.     - दामोदर मावजो, ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यिक  

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनgoaगोवा