शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

गोव्यात वार्का येथे मॅगसनस सुपरमार्केटमध्ये चोरी, ७३ हजारांची रोकड पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 20:41 IST

कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करीत आहेत.

मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यातील किनारपटटीभागातील वार्का येथील मॅगसनस सुपरमार्केटमध्ये अज्ञात चोरटयांनी चोरी करुन ७३ हजारांची रोकड पळविली. बुधवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यासंबधी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. चोरटयाने चेहऱ्यावर मास्क घालून ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. भारतीय दंड संहितेच्या ३८0 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करीत आहेत. तपासात पोलिसांनी सुपरमार्केटच्या वरच्या मजल्यावरील खिडकी उघडी होती असे आढळून आले आहे. या खिडकीतून चोरटा आत शिरला व त्याने ड्रॉव्हर फोडून आतील रोकड लंपास केली. सुपरमार्केटात सुरक्षा रक्षकही नव्हता असे पोलिसांनी सांगितले.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना एक व्हिडीओ क्लिप मिळाली आहेत. त्यात या सुपरमार्केटाच्य बाहेर एक बुरखाधारी इसम उभा असल्याचेही दिसत आहे. एकंदर या चोरीप्रकरणात दोघांचा समावेश असावा असा पोलिसांनी कयास आहे. चोरीसंबधी तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. श्वानपथक तसेच ठसेंतज्ञालाही पाचारण करण्यात आले.