पर्वरी : संजयनगरमधील एका महिलेने आजाराला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी (दि.२१) रात्री हा प्रकार घडला. दीपा दिलीप मोरे (४१, रा. संजयनगर, पर्वरी) या असे महिलेचे नाव आहे. याबाबत पर्वरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार संजयनगरमधील दीपा मोरे यांनी शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरात छपराला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळामध्ये पाठवण्यात आला आहे.दीपा यांचे पती दिलीप मोरे हे टॅक्सी चालक आहेत. अकरा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्या पोटाच्या आजारामुळे गोमेकॉमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून उपचार घेत होत्या. या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक तपास करीत आहेत.
पर्वरीत आजाराला कंटाळून महिलेने घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 16:27 IST