शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा अडथळा सुरुच; पुन्हा बीएसएनएलचा केबल ताेडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2023 15:32 IST

पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे केली जात असताना कुठलेच योग्य नियाेजन केले जात नाही.

- नारायण गावस पणजी: राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. येत्या ७ महिन्यांत पणजीतील ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान कंत्राटदारासमोर आहे. त्यामुळे कामगारांकडून जलदगतीने कामे केली जात आहेत. याचा परिणाम म्हणून अनेक वेळा ताेडातोडही होत आहे. सकाळी गटाराचे खाेदकाम  सुरु असताना बीएसएनएलचा केबल तोडण्यात आला. यामुळे काही बॅँकची इंटरनेट  सेवा काही तास बंद हाेती. त्याचप्रमाणे या अगोदर पाण्याची पाईपलाईन अनेक वेळा फोडली गेली आहे.

पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे केली जात असताना कुठलेच योग्य नियाेजन केले जात नाही. मिळेल तिथे खोदले जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते सध्या खोदले आहेत. गटार खाेदण्याची कामे  घाईगडबडीत केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम करत असताना गटारात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर या अगोदर अनेक वेळा वाहनचालकांचे या खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत. अनेक वेळा पाण्याचे टॅँकर तसेच  इतर माेठी अवजड वाहने या खड्ड्यात रुतून पडली होती. पण तरीही स्मार्ट सिटीची काम नियाेजन पद्धतीने केली जात नाही.

पणजीचे आमदार तसेच महापौर या विषयी  गंभीर दिसत नाही.  स्मार्ट सिटीच्या कामाविषयी विचारल्यावर ते प्रत्येक वेळी लाेकांनी काही काळ कळ साेसावी असे सांगतात. पण सर्वसामांन्याच्या भावना कोणीच ऐकून घेत नाही.  स्मार्ट  सिटीसाठी केंद्र सरकार व राज्यसरकारकडून करोडो रुपये निधी आला आहे. तो खर्च करण्यासाठी  विविध प्रकल्प बांधले जात आहेत. अजूनही स्मार्ट सिटीची ५० टक्के कामे ही बाकी आहेत.

टॅग्स :goaगोवा