शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सांतिनेज येथील 'हा' रस्ता पुढील एक महिन्यासाठी लोकांसाठी असणार बंद

By समीर नाईक | Updated: March 30, 2024 17:52 IST

सांतीनेज येथील सार्वजनिक बांधकाम खाते ते शीतल हॉटेल हा रस्ता स्मार्ट सिटीच्या कामामुळे पुढील एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे.

समीर नाईक, पणजी: सांतीनेज येथील सार्वजनिक बांधकाम खाते ते शीतल हॉटेल हा रस्ता स्मार्ट सिटीच्या कामामुळे पुढील एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास मंडळतर्फे शनिवारी नोटीस जारी करत याची माहिती दिली आहे. रोज या रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांनी या सूचनेची नोंद घ्यावी असे, आवाहन स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे. सदर रस्त्यावर काँक्रिट टाकण्यात येणार असल्याने स्मार्ट सिटीने हा निर्णय घेतला आहे. पण असे असताना या मार्गावरील रेसिडेंशल कॉलनी, व येथे असलेल्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूला पर्यायी मार्ग खुला करण्यात आला आहे. जेणेकरून येथील लोकांना त्रास होता कामा नये. पण हा खास मातीचा रस्ता केवळ येथील स्थानिकांसाठीच असणार आहे, असे स्मार्ट सिटीने आपल्या आदेशात म्हटले आहे.

आतापर्यंत हा रस्ता लोकांसाठी खुला होता आणि, शीतल हॉटेलच्या मागचा रस्ता जो आपटेश्वर मंदिर मार्गे मधुबन सर्कल पर्यंत पोहचणारा रस्ता होता तो कामामुळे बंद होता. पण आता हा बंद असणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पणजीत शिगमोत्सव असल्याने वाहनांचा अतिरेक भार आतील रस्त्यावर येणार आहे, याचाच विचार करत, ट्रॅफिक विभागतर्फे हा रस्ता खुला करण्यात यावा अशी विनंती स्मार्ट सिटीला केली होती, या विनंतीनुसार हा रस्ता शनिवारीच खुला करण्यात आला आहे. 

सदर रस्ता खुला करण्यात आला असला तरी सांतीनेज येथील अनेक कामे अजून शिल्लक राहिली आहे. त्यामुळे येथे ये जा करताना लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाroad transportरस्ते वाहतूकSmart Cityस्मार्ट सिटी