शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'त्या' जंगलचा राजा गेला, फासात अडकून बिबट्याचा मृत्यू

By आप्पा बुवा | Updated: October 10, 2023 13:12 IST

म्हार्दोळ ते मडकई औद्योगिक वसाहत ला जोडणाऱ्या  रस्त्यावर एका बिबट्याचे दर्शन अधूनमधून  घडायचे. काही दिवसांपूर्वी एक बिबट्या एका दुचाकीच्या मागे सुद्धा लागला होता.

फोंडा  - मागच्या काही दिवसापासून सिमेंपायण म्हार्दोळ येथे अधूनमधून दिसत असलेला बिबट्या  एका फासात अडकून मृत्यूमुखी होण्याची घटना घडली आहे.

म्हार्दोळ ते मडकई औद्योगिक वसाहत ला जोडणाऱ्या  रस्त्यावर एका बिबट्याचे दर्शन अधूनमधून  घडायचे. काही दिवसांपूर्वी एक बिबट्या एका दुचाकीच्या मागे सुद्धा लागला होता. त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती .मंगळवारी सकाळी सदरचा नर बिबट्या स्मशान भूमी जवळ एका फासात अडकून लोकांच्या लक्षात आले. या संदर्भात लगेचच वन खाते व पोलिसांना कळविण्यात आले. सदरचा बिबट्या फासात अडकल्याने जागीच मृत्युमुखी पडला होता.

वनखात्याने येऊन सदर बिबट्याला शवचिकित्सा करण्यासाठी फोंडा येथील पशुसंवर्धन खात्याच्या कार्यालयात घेऊन गेले. शवचीकित्सा झाल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजून येईल. त्याच बरोबर तो नेमका किती वर्षाचा होता हे सुद्धा स्पष्ट होईल.बिबट्या फासात अडकला आहे हे लक्षात येताच लोकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. परिणामी औद्योगिक वसाहत व मडकई ला जोडणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक जाम झाले.  दोन्ही बाजूला वाहने अडकून पडली. बिबटा हा नर जातीचा असून तो आपले खाद्य शोधण्यासाठी कदाचित त्या बाजूला आला असेल व फासात अडकला असेल.

फास नक्की कुणासाठी?

वन खात्याच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार सदरचा फास हा बिबट्याला पकडण्यासाठी नाही तर कदाचित रानडुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात आला असावा. जेथून रान डुक्कर जातो नेमके  त्याच वाटेवरून बिबट्याची ये जा चालू असणार .परिणामी रान डुक्कर साठी लावलेल्या फासात अडकून तो मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे.

ह्या संदर्भात उपवननपाल जिस  वरकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला व यापुढे जंगल परिसरामध्ये शोध मोहीम चालू ठेवण्यात येण्यार  असल्याचे सांगितले. परिसरात बिबट्या वगैरे असल्याचे नजरेस येतात लोकांनी वन खात्याच्या निदर्शनास सदर बाब आणून द्यावी. यापुढे जंगलात फिरणाऱ्या शिकाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाईल. असेही सांगितले. बिबट्या दृष्टीस पडण्याची व बिबट्या मृत्युमुखी होण्याची ही ह्या भागातली ही काही पहिलीच घटना नसून काही महिन्यापूर्वी असाच एक जखमी बिबट्या सदर परिसरातील एका गोठ्यात आढळून आला होता. वनखात्याने अथक प्रयत्नानंतर त्याला पकडले होते परंतु हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :goaगोवाTigerवाघ