शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सरकार गप्प बसणार नाही ; आसगाव प्रकरणात सर्व गुडांना तुरुंगात टाकणार - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 27, 2024 14:33 IST

"आगरवाडेकर कुटूंबाला घर नको असेल तर ती त्यांची मर्जी."

किशोर कुबल/पणजी

पणजी : आसगांव येथे घर पाडल्याच्या प्रकरणात सरकार गप्प बसणार नाही. सर्व गुंडांना टाकले जाईल. पोलिस पथके मुंबई व बेळगांवला रवाना झालेली आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले कि,‘या प्रकरणात आगरवाडेकर कुटूंबाला कोणाशीही तडजोड करायची असेल किंवा सरकारकडून त्यांना घर नको असेल तर ती त्यांची मर्जी, परंतु सरकार या प्रकरणात गप्प बसणार नाही. घर पाडणाय्रा सर्व गुंडांना आत टाकीन. जे कोणी दोषी आहेत त्या सर्व जणांवर कठोर कारवाई केली जाईल.’

आगरवाडेकर कुटूंबाने तक्रार मागे घेण्याची तयारी चालवली असल्याने त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले.दरम्यान, स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनीही या कुटुंबाने अचानक घुमजाव केल्याबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, 'आम्ही सर्वजण मदतीला गेलो परंतु या कुटुंबांने सर्वांनाच गृहीत धरले. आज सर्व गोवा त्या कुटुंबावर नाराज आहे. मुख्यमंत्र्यांनी क्राइम ब्रांचमार्फत चौकशी चालूच ठेवावी व हे प्रकरण धसास लावावे. या कुटुंबाने मला भेटण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली होती परंतु मला आता त्यांना भेटायचे नाही.'

गोव फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणानंतर सरकारला उपरोधिक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की,' ज्या गुंडांनी घर पाडले त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवावे तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले त्यांना राष्ट्रपती पदके देऊन त्यांचा सन्मान करावा. सरदेसाई पुढे म्हणाले की आमदार डिलायला लोबो यांनी एका रात्रीत पक्ष बदललाला तसेच या कुटुंबाने केले. त्यामुळे डिलायला यांना धक्का बसण्याचे कारण नाही. ते म्हणाले की कुटुंबातील महिलेची 'लाय डिटेक्टर' चाचणी घेतल्यास सर्व काही बाहेर येईल.'

टॅग्स :goaगोवा