शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबूश वि. पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री दोन हात दूरच

By किशोर कुबल | Updated: January 11, 2024 14:15 IST

प्रतिक्रियेस नकार : स्मार्ट सिटीचे काम ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

पणजी : बाबूश विरूद्ध पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन हात दूरच राहणे पसंत केले आहे. या वादावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. राजधानी शहरातील स्मार्ट सिटीची सर्व कामे येत्या ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मी दिलेले आहेत, एवढेच ते म्हणाले.

स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पणजीचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केला होता. पर्रीकर यांनी २५ वर्षे राजधानी शहराची वाट लावली, असा आरोप करताना त्यांनी आणलेल्या सल्लागारांनी स्मार्ट सिटीच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खाल्ले, असा आरोपही बाबूश यांनी केला होता. पंचवीस वर्षात सल्लागारावर जेवढा खर्च केला तेवढ्या पैशात दोन पूल बांधता आले असते. पर्रीकरांनी साधे पदपथ बांधण्यासाठी ही सल्लागार नेमले, अशी टीकाही त्यांनी केली होती. शिवाय उत्पल यांनी वारशाने काही मिळेल म्हणून वाट पाहू नये. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत माझ्याविरुद्ध लढावे, असे आव्हानही  दिले होते.बाबूशनी प्रथमच एवढ्या कठोर शब्दात दिवंगत पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केल्याने भाजपातही खळबळ माजली आहे.मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर भाषण टाळले.

 भाजप प्रवक्त्याकडून समाचारदरम्यान, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी बाबूशनी केलेल्या टिकेचा ट्विटरवर समाचार करताना घेताना 'जे टीका करत आहेत, त्यांनी पर्रीकर यांचे थोडे तरी गुण आत्मसात करावेत. पर्रीकरांनी नेहमीच लोकांप्रती त्याग भावना दाखवली. लोकांना गरज पडेल तेव्हा ते त्यांच्या मदतीला धावत असत. आधुनिक गोव्याचे खरे शिल्पकार होते', असे म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात की,'दोन दशकात आमदार म्हणून पर्रीकर यांनी पणजीचा कायापालट केला. शहरातील रस्ते रुंद केले. आयनॉक्ससारखे सिनेमागृह उभे केले. शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या. पणजी शहर सुरक्षित बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पूर्वी राजधानी शहरात गॅंगवर होत होती, ती बंद केली. पर्रीकर यांचे काम काही ओळीत स्पष्ट करू शकत नाही. त्यांना  प्रशासनाची उत्तम जाण होती टीका करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे.'

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत