शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घोडेव्हाळ अपघातातील मृत सासरा व सुनेच्या मृतदेहांवर शवचिकत्सेनंतर मृतदेह दिला कुटुंबियांच्या स्वाधीन

By सूरज.नाईकपवार | Updated: March 18, 2024 17:33 IST

ट्रक चालकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी.

सूरज नाईकपवार, मडगाव: गाेव्यातील दक्षिण जिल्हयातील घोडेव्हाळ बेंदुर्डे येथे शनिवारी  भीषण अपघातात ठार झालेल्या देवराज सातनी व हस्कु सातनी या सासरा व सुनेच्या मृतदेहावर आज सोमवारी शवचिकित्सा होउन नंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रकचालक राकेश गोरे याला  न्यायालयात हजर केले असता, त्याला अधिक तपासासाठी दोन दिवसांची पाेलिस कोठडी देण्यात आली.

शनिवारी रात्री कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोडेव्हाळ येथे मंगळुरुहून कोल्हापूर येथे काजूच्या बिया घेउन जाणारा ट्रक दरीत कोसळला होता. या ट्रकमध्ये चालक , क्लिनरसह व पाच लहान मुलांसह एकूण बाराजण होते. यातील चारजणांवर सदया गोमेकॉत तर अन्य पाचजणांवर येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार चालू आहे.

मयताच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर त्यांचा मृतदेह मृत देवराज याच्या अन्य एका मुलाच्या ताब्यात देण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली. तोही त्यांच्यासोबत या ट्रकमध्ये होता. सुदैवाने त्याला या अपघातात मोठी इजा पोहचली नाही,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व कुटुंब मूळ गुजरात राज्यातील असून, ते मंगळुरुहून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. फुगे विक्री करुन ते आपला उदरनिर्वाह करीत होते. मंगळुरुहून ते त्या ट्रकमध्ये चढले होते. तो ट्रक कोल्हापूर येथे पोहचल्यानंतर ते नंतर तेथून गुजरातला जाणार होते. ट्रकचालक राकेश याने गोव्याची सीमा ओलांडल्यानंतर दारु ढोसली होती. दारुच्या नशेत तो ट्रक चालवित होता. घोडेव्हाळ येथे पोहचल्यानंतर त्याचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने सरळ तेथील कठडयाला धडक दिली व नंतर ट्रक १० मीटर खोल दरीत कोसळला होता.

टॅग्स :goaगोवा