शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पहिल्या चार्टर विमानाचे आगमन १ ॲाक्टोबरला शक्य

By किशोर कुबल | Updated: August 18, 2023 15:11 IST

किशोर कुबल पणजी : गोव्यात यंदा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी १ ॲाक्टोबरला रशियातून मॉस्को येथून पहिले चार्टर विमान येण्याची ...

किशोर कुबल

पणजी : गोव्यात यंदा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी १ ॲाक्टोबरला रशियातून मॉस्को येथून पहिले चार्टर विमान येण्याची शक्यता आहे. गोव्याला रशिया, ब्रिटन, कझाकिस्तान आणि इस्रायलकडून पर्यटक मिळतील, अशी अपेक्षा आहे. 

गेल्या हंगामात काही टूर ऑपरेटर इस्रायलमधील त्यांच्या समकक्षांच्या संपर्कात होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून आले नाहीत. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी गोव्याला इस्रायलकडून पर्यटक मिळाले होते. परंतु  नंतर ते थांबले. कोविड महामारीच्याआधी दरवर्षी अडीच ते तीन लाख विदेशी पर्यटक गोव्याला भेट देत असत. ९०० हून अधिक चार्टर विमाने गोव्यात येत असत. रशिया, इंग्लंडमधून येणाय्रा पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे.

दरवर्षी गोव्याचे पर्यटनमंत्री, अधिकारी विदेशात पर्यटन मेळ्यांमध्ये सहभागी होत असतात. ज्या देशात जातील तेथे ‘रोड शो’ करतात. परंतु त्याचे फलित मात्र दिसत नाही, अशी व्यावसायिकांची तक्रार आहे. पर्यटन व्यावसायिकांनी या प्रकाराला सरकारचे चुकीचे मार्केटिंग धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, असे आढळून आले आहे कि,‘रशियाचे पर्यटक जास्त खर्च करत नाहीत. त्या तुलनेत ब्रिटिश पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि त्याचा गोव्यातील पर्यटन उद्योगांना फायदा होतो. रशियन पर्यटक एक तारांकित किंवा दोन तारांकित अशा छोट्या हॉटेलांमध्ये राहतात. रशियन चार्टर विमानांमधून येणारे पर्यटक हे कारागीर, पेंटर अशा पद्धतीचे लहान व्यवसायिक पैशांची बचत करून फिरायला आलेले असतात. त्यामुळे ते जास्त खर्च करत नाहीत.

ब्रिटिश पर्यटकांचे गोव्यात सरासरी १४ रात्री गोव्यात वास्तव्य असते. ब्रिटिश पर्यटक भारतात आले की, एकाच ठिकाणी किंवा एकाच हॉटेलात राहतात. खरा आनंद लुटण्यासाठी येणारे हे पर्यटक रिलॅक्स मूडमध्ये आपली सुट्टी येथे मजेत घालवत असतात आणि मोठ्या प्रमाणात ते खर्चही करीत असतात त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना याचा बराच लाभ होत असतो.