शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

भोमा येथील आंदोलन चिघळले; सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:39 IST

सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी सकाळी प्रशासन अधिकारी भोम येथे सीमांकन करण्यासाठी पोहोचले. अधिकारी आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले.

- अजय बुवा

फोंडा : भोम येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गप्रकरणी चालू असलेले आंदोलन बुधवारी चांगलेच चिघळले. जमिनीचे सीमांकन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना रोखल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी १०० ग्रामस्थांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी थेट कुळे पोलिस ठाण्यात केली. तीन तास ग्रामस्थानी पोलिसांशी हुज्जत घातली.

सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी सकाळी प्रशासन अधिकारी भोम येथे सीमांकन करण्यासाठी पोहोचले. अधिकारी आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. प्रकल्पाला विरोध करणारे संजय नाईक हेही घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण उच्च न्यायालयात असताना सीमांकन कसे काय करता? असा सवाल करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना वाचारत धारेवर धरले.  यावेळी मोठ्या संख्येने पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. 

पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, संयुक्त मामलेदार संगीता बिर्जे आदी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांचा आक्षेप असतानाही मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ग्रामस्थ धावून जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना अडवले. पोलिस बंदोबस्तात काम सुरू आहे ते पाहून ग्रामस्थ आणखीनच खवळले व त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यास सुरुवात केली. आंदोलनात महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

ग्रामस्थांची धरपकडआंदोलक आक्रमक बनल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरू केली. काही युवकांना पोलिसांनी पकडून ठेवले. अटक करणार तर सगळ्यांनाच अटक करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. परंतु त्या अगोदर सीमांकन बंद ठेवा, असा आग्रह धरला. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलून चार बसमध्ये कोंबून कुळे येथील पोलीस ठाण्यात आणले.

सरपंचांनाही उचललेग्रामस्थांना ताब्यात घेण्याचे सत्र चालू झाल्याचे लक्षात येताच सरपंच दामोदर नाईक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन कुळे येथे त्यांची रवानगी केली.

हे सर्व मंत्र्यांनीच घडवून आले : ग्रामस्थज्यावेळी पोलिसांनी अटक सत्र सुरू केले त्यावेळी काही महिला प्रसार माध्यमांकडे बोलताना म्हणाल्या की, काहीच चूक नसताना जबरदस्तीने आमच्या मुलांना पोलिसांनी बसमध्ये टाकले आहे. हा प्रकल्प आम्हाला नको आहे. परंतु आमदार गोविंद गावडे यांच्यामुळे हा प्रकल्प येत आहे. आज जे प्रकरण घडले त्याला मंत्रीच जबाबदार आहेत. सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्रामस्थांची दुपारी मुक्तता करण्यात आली.

टॅग्स :goaगोवा