पेडणे : अमानुष मारहाण करून चिखलात फेकून दिल्यामुळे एका अमेरिकन पर्यटकाचा गुदमरून मृत्यू होण्याची घटना तुमवाडा-कोरगाव येथे मंगळवार, दि. १२ रोजी घडली. कायतान व्हॉलते असे या ३० वर्षीय पर्यटकाचे नाव आहे. चोर समजून जमावाने त्याला पाठलाग करून मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. जमावापासून बचावासाठी शेतातील बांधावरून धावताना तो तोल जाऊन चिखलात पडला. तेथेही त्याला मारहाण झाली. शेवटी चिखलात गुदमरून त्याचा मृत्यू झाला. (पान २ वर)
‘त्या’ पर्यटकाचा खून?
By admin | Updated: January 14, 2016 03:03 IST