शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लाला की बस्तीत कोलवाळ पोलिसांची भाडेकरुंची तपास मोहीम; ९६ जणांना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: May 23, 2024 15:36 IST

स्थलांतरीत लोक तसेच कामगार वर्गाचा राज्यातील विविध भागात घडत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणात हात असल्याचे आढळून आल्यानंतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर कोलवाळ पोलिसांनी थिवीतील लाला की बस्ती येथे भाडेकरू  तपासणी मोहीम हाती घेतली.

काशिराम म्हांबरेम्हापसा :  स्थलांतरीत लोक तसेच कामगार वर्गाचा राज्यातील विविध भागात घडत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणात हात असल्याचे आढळून आल्यानंतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर कोलवाळ पोलिसांनी थिवीतील लाला की बस्ती येथे भाडेकरू  तपासणी मोहीम हाती घेतली. मोहिमे दरम्यान तेथे भाड्याने राहणाºया सुमारे ९६ भाडेकरुंनी आपली रितसर रितसर नोंदणी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आले.  त्यामुळे त्याच्या विरोधात सीआरपीसीच्या कलम ४१ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

माडेल - थिवी येथेअसलेल्या या वादग्रस्त अशा लाला की बस्तीत येथे गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम हाती घेण्यात आली होती.  मोहिमे दरम्यान तेथे भाड्याने राहणाºया सुमारे ९६  हून जास्त भाडेकरुंनी तसेच भाडेकरुंच्या मालकांनी त्यांची रितसर नोंदणी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आले.  

अधिक्षक अक्षत  कौशल तसेच उपअधिक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या मोहिमे दरम्यान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होती.  या मोहिम दरम्यान पोलिसांकडून प्रत्येक घरा घरात जाऊन भाड्यावर राहण्यांची पडताळणी केली.  कायद्यानुसार भाडेकरु म्हणून नोंदणी न केलेल्यांना तसेच योग्य कागदपत्रे सादर न केलेल्यांना पोलीस स्थानकावर आणून त्यांची चौकशी यावेळी  करण्यात आली. 

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनेघडलेल्या गुन्ह्यांचा तातडीने शोध लागावा या हेतूनेही मोहीम घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. कोलवाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील इतरही भागात अशा प्रकारची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पूर्वीही अनेकवेळा या भागातून अशाच प्रकारची मोहिम हाती घेण्यात आली होती.