शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात टॅक्सींना मीटर सक्तीचे, बुधवारपर्यंत आदेश जारी करा - न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 22:03 IST

राज्यातील सर्व टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल मीटर सक्तीचे करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून देण्यात आला. त्यासाठी आणखी मूदत वाढवून देण्यास खंडपीठाने नकार दिला. 

पणजी: राज्यातील सर्व टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल मीटर सक्तीचे करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून देण्यात आला. त्यासाठी आणखी मूदत वाढवून देण्यास खंडपीठाने नकार दिला. गोव्यात टँक्सी व्यावसायिक मनाला येईल तसे भाडे आकारात असल्यामुळे पर्यटकांची सतावणूक आणि फसवणूक होत असल्याचा दावा करून ट्युर अँड ट्रॅवल्स असोसिएशन आॅफ गोवा कडून दाखल क रण्यात आलेल्या याचिकेवर आदेश देताना खंडपीठाने टॅक्सी व्यावसायिकांना  डिजिटल मीटर बसविणे सक्तीचे करण्यात यावे असे म्हटले आहे. या प्रकरणात बुधवारपर्यंत आदेश जारी करून न्यायालयात तो सादर करण्यात यावा असेही सरकारला सुनावले आहे. टॅक्सी व्यावसायिकांना  डिजिटल मिटरची सक्ती करण्यात येणार असल्याचे सरकारकडूनही जाहीर करण्यात आले होते. या अगोदरच्या सुनावणीत अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी त्याची माहिती खंडपीठाला दिली होती. परंतु त्यासाठी मूदत मागण्यात आली होती. मध्यंतरी निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळेही धोरणात्मक निर्णय सरकारला घेता आले नव्हते. या प्रकरणात प्रतिवादी असलेल्या वाहतूक खात्याकडून त्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली होती. या प्रकरणात अजूनही वेळ देण्यात यावी अशी मागणी सरकारकडून करण्यात आली होती. नोव्हेबरच्या अखेरीस तसा आदेश जारी केला जाणार असल्यामुळे तेवढी मुदत देण्यात यावी अशी मागणी क रण्यात आली होती. परंतु खंडपीठाने आणखी मूदतवाढवून देण्याची मागणी मंजूर केली नाही. त्यामुळे सरकारला आता बुधवारपर्यंत तसा आदेश जारी करून पुढील सुनावणीत त्याची माहिती न्ययालयाला माहिती द्यावी लागणार आहे. राज्यात १५ हजारपेक्षा अधिक टॅक्सी व्यावसायिक आहेत. सर्व टॅक्सींना डिजिटल मीटर सक्तीचा करण्याची अधिसूचना २०१५ साली  जारी केली होती. परंतु टॅक्सी व्यवसायिकांच्या दबावामुळे हा आदेश स्थगित ठेवण्यात आला होता. मिटर बसविण्यासाठी ५० टक्के सरकारने सवलत द्यावी अशी या व्यावसायिकांची मागणी होती.

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवा