शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसातही आंब्याची चव कायम; नीलम व मल्लिका आंब्यांची बाजारपेठेत विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:36 IST

गोव्यात परराज्यातील आंब्यांना अजूनही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा/मडगाव : राज्यात आंब्यांचा हंगाम जूनपासून संपला असला तरी आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून येणारे नीलम व मल्लिका आंबे येथील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी आंबे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वेंगुर्ला, देवगडमधील प्रसिद्ध हापूस आंबा विक्रीसाठी मुंबईला जातो, ते आंबे राज्यात फार कमी प्रमाणात येतात, अशी माहिती मडगावातील घाऊक आंब्यांचे व्यापारी आनंद नाईक यांनी दिली. येथील बाजारात नीलम आंबा आकारानुसार २०० ते ३०० रुपये प्रति डझन, मल्लिका आंबे १५० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहेत. मल्लिका आंबा जास्त विकला जातो. तोतापुरी आंबाही विक्रीसाठी उपलब्ध आहे. गांधी मार्केटमधील घाऊक आंब्याचे व्यापारी अहमद खान यांनी नीलम आंबा आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात येत असून तो १०० रुपये प्रति किलो दराने विकला जातो, असे सांगितले.

सध्या आंब्याचा मोसम संपला असला तरी गोवेकरांना शेजारील राज्यातून आयात केलेला आंबा खायला मिळतोय. आंबा हे फळ सर्वांच्या ओळखीचे व आवडीचे असल्यामुळे आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक आंब्याच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात. सध्या राज्यातील आंब्याचा हंगाम उलटून गेला आहे, तरीही बाजारपेठेमध्ये शेजारील राज्यातून येणारे आंबे उपलब्ध होत आहेत.

आवडता आंबा म्हणजे मानकुराद. मसुराद, मालगेस, पायरी हे आंबेही आहेत. बहुतेक लोकांचा मानकुराद हा जास्त आवडीचा आंबा असल्यामुळे महाग असूनही खरेदी करतात. सध्या गोव्यातील आंब्याचा हंगाम उलटून गेलेला आहे. तरीही गोव्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये काही विक्रेत्यांकडे नीलम, तोतापुरी, बदामी या जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये तोतापुरी आंबा १२० रुपये प्रति किलो तर नीलम १०० ते १२० रुपये प्रति किलो व बदामी हा आंबा अन्य आंब्याच्या तुलनेत गोड असल्यामुळे थोडा महागात असून १५० रुपये प्रति किलो अशा दराने उपलब्ध आहेत.

हे आंबे कोल्हापूर व कर्नाटक येथून विक्रीसाठी उपलब्ध होतात.या आंब्याची विक्री काही प्रमाणात स्थानिक विक्रेते तर बिगर गोमंतकीय मोठ्या प्रमाणात करतात. अनेक विक्रेते कच्चे आंबे आणून नैसर्गिक पद्धतीने ते पिकवतात तर काही जण रसायनाचा वापर करून ते पिकवतात.

...मानकुरादला गोवेकरांचा प्रतिसाद

गोवेकरांच्या आवडीचा आंबा म्हणजे मानकुराद. त्यासाठी गोवेकर कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. राज्यात आंब्यांचा हंगाम मार्च महिन्याच्या अखेरपासून सुरु होतो. यावर्षी आंब्याची आवक कमी होती. त्यामुळे दर काहीसा जास्त होता, तरीही अनेक गोवेकरांनी मानकुराद आंबा खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. यंदा राज्यात कर्नाटकमधील आंबा विक्रीसाठी राज्यात आला होता.

तोतापुरी आंबा पावसाळ्यामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे या आंब्याला विशेषतः कच्च्या आंब्याला जास्त मागणी असते. बदामी आंबा हा चवीला गोड असल्यामुळे त्यालाही मागणी आहे. नीलम आंबा हा बहुतेक कोल्हापूर येथून दाखल होतो पावसाळ्यात गोव्यातील आंबे संपलेले असल्यामुळे काही लोकांकडून खरेदी केली जाते. -अनिल काझीर, आंबा विक्रेता फोंडा.

 

टॅग्स :goaगोवा