शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ताळगाव पंचायतवर बाबुश मोन्सेरात यांचेच वर्चस्व; ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंटचे सर्व उमेदवार विजयी

By समीर नाईक | Updated: April 29, 2024 15:53 IST

विरोधक सिसील रॉड्रीग्जच्या ताळगावकर युनायटेड पॅनलने अनेक ठिकाणी बऱ्यापैकी झुंझ दिली, पण एकही प्रभागात आपला उमेदवार जिंकून आणण्यास ते अयशस्वी ठरले.

समीर नाईक, पणजी: ताळगाव पंचायतवर बाबुश मोन्सेरात यांचेच वर्चस्व आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ताळगाव पंचायतची मतमोजणी सोमवारी झाली, यात मंत्री बाबुश मोन्सेरात आणि आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी समर्थन दिलेले ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंट पॅनल विजयी झाले. ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंटचे सर्व उमेदवार विजयी झाले. विरोधक सिसील रॉड्रीग्जच्या ताळगावकर युनायटेड पॅनलने अनेक ठिकाणी बऱ्यापैकी झुंझ दिली, पण एकही प्रभागात आपला उमेदवार जिंकून आणण्यास ते अयशस्वी ठरले.

मोन्सेरातच्या पॅनलमधील चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी ताळगाव येथे ११ पैकी ७ प्रभागासाठी निवडणूका पार पडल्या. सोमवारी कांपाल, बाल भवन येथे मतदान पार पडले. सकाळी ८.३० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी १२.३० च्या सुमारास मतमोजणी संपली. यादरम्यान सकाळपासूनच ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंट, आणि ताळगावकर युनायटेड यांच्या समर्थकांनी बाल भवन परीसरात गर्दी केली होती. यावेळी मंत्री बाबुश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, सिसील रॉड्रीग्ज, फ्रान्सिस कुएल्हो व इतर नेते उपस्थित होते. सर्व उमेदवार जिंकल्याचे समजताच समर्थकांनी फटाके लावत जल्लोष करायला सुरुवात केली.

प्रभाग १ मधून सिध्दी केरकर, प्रभाग २ मधून माजी सरपंच आग्नेल डिकुन्हा, प्रभाग ३ मधून हेलेना परेरा, प्रभाग ४ मधून रतिका गावस, प्रभाग ५ मधून उशांत काणकोणकर, प्रभाग ६ मधून एस्टेला डिसोझा, प्रभाग ७ मधून माजी सरपंच जानू रोझारीयो, प्रभाग ८ मधून मारीया फर्नांडिस, प्रभाग ९ मधून संजना दिवकर, प्रभाग १० मधून सागर बांदेकर, आणि प्रभाग ११ मधून सिडनी बार्रेटो निवडून आले आहेत.

टॅग्स :goaगोवा