शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'वक्तव्य मागे न घेतल्यास सरदेसाईंना काळे झेंडे दाखवू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 22:22 IST

मुक्तीदिन वक्तव्य प्रकरणात गोसुमचा इशारा

पणजी:  जनमत कौलदिन हा गोवा मुक्तीदिनापेक्षा मोठा दिवस असल्याच्या नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या विधानाचा गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी निषेध केला आहे. हा राष्ट्रवादाचा अपमान असून सरदेसाई यांनी २६ जानेवारीपूर्वी हे वक्तव्य मागे न घेतल्यास त्यांच्या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे झेंडे दाखविले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. वेलिंगकर यांनी सांगितले की, गोमंतकियांसाठी जनमत कौल दिन हा महत्त्वाचाच आहे आणि त्या बद्दल दुमत नसावे. जनमत कौलामुळे गोवा महाराष्ट्रापासून वेगळा झाला आणि ते गोव्यातील लोकांसाठी फायदेशीर ठरले. परंतु अर्थाचा अनर्थ करून काहीही बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. कोणत्याही विशिष्ट समूहाला खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. राष्ट्रवादाच्या मुद्यावर तडजोड नसावी. सरदेसाई यांनी या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि वक्तव्य मागे घ्यावे. २६ जानेवारीपर्यंत त्यांनी विधान मागे घेतले नाही तर गोवा सुरक्षामंच या मुद्यावर आंदोलन करील. सरदेसाई यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखविले जातील अशा इशाराही त्यांनी दिला आहे. जनमत कौल घेण्याचे १०० टक्के श्रेय कुणा एकाला देणेही योग्य ठरणार नाही. जनमत कौलासाठी पुरूषोत्तम काकोडकर, दैनिक राष्ट्रमत व कोंकणी चळवळीतील लोक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी खूप काम केलेले आहे. युनायटेड गोवन्स या त्यावेळच्या विरोधी पक्षाने जॅक सिकवेरा यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच गोवा हे स्वतंत्र राज्य राहिले आहे. त्यामुळे त्याचे श्रेय एका व्यक्तीला देणे चुकीचे ठरेल असे त्यांनी सांगितले. यावेळी अरविंद भाटीकर व्यासपीठावर होते. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण