शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच नादात बिबट्याचा चक्क बोरी गावातील रस्त्यांवरून फेरफटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 09:02 IST

लोकांची गर्दी : अनेकांनी केले कॅमेराबद्ध; वन खात्याकडून जेरबंद.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : बोरी येथे गेल्या काही दिवसांपासून लोकवस्तीमध्ये येऊन धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी सकाळी वनखात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले.

सकाळी सहाच्या सुमारास बिबट्या बेतकी येथून बोरी पुलाच्या सर्कलपर्यंत अक्षरशः फेरफटका मारत राहिला. वाड्यावर फिरणाऱ्या या बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. सुदैवाने बिबट्याने कोणतीही दुखापत केली नाही.

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबटा मागील काही दिवसापासून शिरशिरे, दब कुड्याळ वाड्यावर दिवसा आणि संध्याकाळीही दिसत होता. गेल्या शुक्रवारी गावातील काही युवकांना तो स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ दिसला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी वनखात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळविले होते. आठवडाभरात बिबट्याचा वावर अधिकच वाढल्याने दहशतीचे वातावरण होते. या बिबट्याने शिरशिरे ते देऊळवाडा मार्गावरून बेतकी, खार्जोडा या परिसरात भ्रमंती केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गुरुवारी दुपारी बिबटा खार्जोडा येथील वाड्यावर व श्री साईबाबा मंदिर परिसरात फिरताना दिसत होता. शुक्रवारी तो बोरी पुलाच्या सर्कलवर फिरत होता. यावेळी डुक्करांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे वापरून बिबट्याला पकडण्यात आले. त्याला वन खात्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने पिंजऱ्यात जेरबंद केले.

 

टॅग्स :goaगोवाleopardबिबट्या