शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हणजूणच्या जगप्रसिद्ध फ्ली मार्केटला सुुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 21:04 IST

म्हापसा : हणजूण येथील जगप्रसिद्ध अशा फ्ली मार्केटला दमदार सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेले हे फ्ली मार्केट हणजूण येथे दर बुधवारी भरते.

म्हापसा : हणजूण येथील जगप्रसिद्ध अशा फ्ली मार्केटला दमदार सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेले हे फ्ली मार्केट हणजूण येथे दर बुधवारी भरते. हे मार्केट म्हणजे गोव्यात येणा-या देश-विदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असते. आलेला पर्यटक इथे उपस्थिती लावल्याशिवाय माघारी जात नाही. विदेशी लोकांनी गोव्यात येताना आणलेल्या वस्तूंची विक्री या मार्केटचे एक वैशिष्ट्य मानले जाते. तसेच उत्तर भारतातील खास करून काश्मिरी व नेपाळी व्यापारी या मार्केटला उपस्थिती लावून आपल्या वस्तूंची विक्री करीत असतात.या फ्ली मार्केटमध्ये लेदर, काचेच्या आकर्षक वस्तू, लोकरीच्या वस्तू, जुन्या पण किमती वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर इथे होत असते. या मार्केटात चालणा-या व्यवसायाला जोडून इतरही व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांना सुद्धा बराच फायदा होत असतो. या किनारी भागातील स्थानिक हणजूण-कायसूव पंचायतीला या मार्केटपासून सर्वाधिक उत्पन्न मिळत असले तरी येथे येणा-या पर्यटकांना व व्यावसायिकांना ब-याच गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.हणजूण आठवडी बाजार म्हणून सरकार दरबारी नोंद असलेल्या या फ्ली मार्केटची व्याप्ती दरवर्षी वाढत असते. काही वर्षापूर्वी या मार्केटमध्ये दिड हजाराच्या आसपास दुकाने होती. आता त्यात प्रचंड वाढ होऊन साडेतीन ते चार हजारावर पोहोचली आहेत. सोपो पावणीत प्रचंड वाढ झाल्याने व्यावसायीकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. काही वेळा ठेकेदाराच्या दडपशाहीला सामोरे जावे लागते. पंचायतीचा ५ रुपये प्रतिचौरस मीटर असा दर असताना सरसकट २०० ते २५० रुपये व्यावसायिकांकडून आकारले जातात.सोपोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पंचायतीला उत्पन्न मिळत असूनही सुलभ शौचालये तसेच इतर सुविधांच्या अभावी पर्यटकांना व व्यवसायिकांना सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असूनही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाय योजना या ठिकाणी केली जात नाही. सीसीटीव्हीची सोय सुद्धा नसल्याने एखाद्या वेळेस अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :goaगोवाMarketबाजार