शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘एन्डलेस बॉर्डर्स’ चित्रपटाला सुवर्णमयूर; मायकल डग्लसला सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

By किशोर कुबल | Updated: November 28, 2023 19:47 IST

अभिनेता ऋषभ शेट्टीला खास परीक्षक पुरस्कार प्राप्त झाला.

पणजी : गोव्यात भरलेल्या ५४ व्या ‘इफ्फी’च्या दिमाखदार समारोप सोहळ्यात ‘एन्डलेस बॉर्डर्स' या झेक चित्रपटाला प्रतिष्ठेचा सुवर्णमयूर पुरस्कार व ४० लाख रुपये रोख बक्षिस प्राप्त झाले. १२ आंतरराष्ट्रीय व ३ भारतीय चित्रपट या पुरस्कारासाठी स्पर्धेत होते. सुप्रसिध्द हॉलिवूड निर्माता, अभिनेता मायकल डग्लस यांना सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते डग्लस यांनी पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट वेब मालिका पुरस्कारासाठी ‘पंचायत’ची निवड झाली. ऋषभ शेट्टीला खास परीक्षक पुरस्कार प्राप्त झाला. 'एंडलेस बॉर्डर्स' झेक चित्रपट अब्बास अमिनी यांनी दिग्दर्शित केला आहे.

इफ्फीतील अन्य पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार - स्टिफन कोमंदारेव
  • सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता - पौरिया रहीमी सॅम
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार - मेलानी थिएरी
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म - व्हेन द सीडलिंग्ज ग्रो, (तुर्की चित्रपट- निर्माता रेगर आझाद काया)
  • आयसीएफटी युनेस्को  गांधी पदक - ‘ड्रिफ्ट'
  • सर्वोत्कृष्ट वेब सिरीज - पंचायत 
  • विशेष ज्युरी पुरस्कार - ऋषभ शेट्टी

दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी बोलताना म्हणाले की,  चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देऊन गोवा चित्रपट उद्योगासाठी स्वर्ग बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणत्याही अडचणींविना सुटसुटीतपणे परवानग्या, आवश्यक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. चित्रपट उद्योगासाठी गोवा  रेड कार्पेट अंथरत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान गेले नऊ दिवस गोव्यात चाललेल्या इफ्फीमध्ये ७ हजार प्रतिनिधी उपस्थित राहिले. ७८ देशांतील ३७० चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी