शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुशांत हरमलकर; माजी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला

By काशिराम म्हांबरे | Updated: March 5, 2024 14:59 IST

उद्या ६ मार्च रोजी उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. माजी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

म्हापसा: काशिराम म्हांबरे 

म्हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुशांत हरमलकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे या पदासाठी त्यांची निवड निश्चित मानली जाते. उद्या ६ मार्च रोजी उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. माजी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी विरोधी गटाकडूनही अर्ज दाखल होण्याची संभावना व्यक्त केली जात होती मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्याने सुशांत हरमलकर यांची बिनविरोध निवड केली जाणार आहे.

सत्ताधारी गटात झालेल्या करारानुसार फडके यांनी २१ फेब्रूवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा पालिका प्रशासन संचालनालयकडे सादर केला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. विराज फडके यांची गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. सुमारे वर्षभर या पदी राहिल्यानंतर सत्ताधारी गटात झालेल्या अलिखित करारानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला  होता.

नव्या उपनगराध्यक्षांची निवड करण्यासाठी पालिका मंडळाची विशेष बैठक उद्या पालिकेच्या सभागृहात सकाळी संपन्न होणार आहे. त्यावेळी त्यांची अधिकृत रित्या निवड केली जाणार आहे. अर्ज सादर करताना हरमलकर यांच्यासोबत उपसभापती जोशूआ डिसोजा, नगराध्यक्षा डॉ. नूतन बीचोलकर तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.