शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छ किना-यांमुळे ‘सुप्रानॅशनल’ प्रथमेश अस्वस्थ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 21:25 IST

मॉडेल्स क्षेत्रातील सर्वाेच्च अशी स्पर्धा म्हणजेच सुप्रानॅशनल. ही स्पर्धा जिंकून इतिहास रचणारा गोमंतक भूमीतील प्रथमेशमावळींगकर शुक्रवारी मायभूमीत दाखल झाला.

- सचिन कोरडे 

पणजी : मॉडेल्स क्षेत्रातील सर्वाेच्च अशी स्पर्धा म्हणजेच सुप्रानॅशनल. ही स्पर्धा जिंकून इतिहास रचणारा गोमंतक भूमीतील प्रथमेशमावळींगकर शुक्रवारी मायभूमीत दाखल झाला. प्रथमेशचे आता जगभर चाहते आहेत. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वॉटरमॅन, अक्वॉमॅन म्हणून संबोधला जाणारा सुप्रानॅशनल प्रथमेश गोव्यातील अस्वच्छ किना-यांबाबत मात्र अस्वस्थ आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे दु:ख व्यक्त केले. प्रथमेश म्हणाला की, आज गोव्याची जी जगभर ओळख आहे ती येथील निसर्गसौंदर्यामुळे. गोव्यातील समुद्रकिनारे विदेशींना भुरळ घालतात. त्याच जोरावर पर्यटन व्यवसायही चालतो. हे समुद्रकिनारेच नसतील तर.... आज किनाºयांवर प्लास्टिक पसरले आहे. प्रदूषण वाढले आहे. अस्वच्छता पसरली आहे. हे असेच सुरू राहिले तर गोव्याच्या अस्तित्वाला धोका आहे. त्यामुळे हे थांबायला हवे. आज जागतिक स्तरावर गोव्याचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो आणि येथे आल्यानंतर तेवढेच दु:खही होते. कारण येथील समुद्राशी माझे अत्यंत जवळचे नाते आहे. त्यामुळे मी ‘बीच क्लिनिंग’साठी योगदान देणार आहे. त्यासाठी स्व:ता एनजीओ स्थापन करणार. मुंबईत अशा संस्थेशी मी जुळलेलो आहे. गोव्यातही माझ्याकडून असे कार्य व्हावे, यासाठी मी उत्सुक आहे.पोलंड येथे झालेली सुप्रानॅशनल स्पर्धा जिंकणारा प्रथमेश हा आशियातील एकमेव स्पर्धक ठरला. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली स्पर्धा जिंकून प्रथमेशने फॅशन आणि मॉडेल क्षेत्राला आपल्याकडे आकर्षित केले. आता या क्षेत्रातील तमाम लोक प्रथमेशच्या संपर्कात आहेत. मुंबईत जंगी स्वागतानंतर प्रथमेश प्रथमच गोव्यातील पत्रकारांपुढे आला. मुलाखतीत त्याने आपला प्रवास उलगडला. एक राष्ट्रीय फुटबॉलपटू, नंतर मिस्टर इंडिया आणि आता मिस्टर सुप्रानॅशनल... याबाबत काय सांगशील, असे विचारल्यावर तो भावूक झाला. तो म्हणाला, खेळाडू म्हणून जेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करीत होतो आणि भारताची जर्सी अंगावर असताना राष्ट्रगीत वाजायचे तेव्हा छाती अभिमानाने फुलत होती. मी वरिष्ठ संघाकडून खेळू शकलो नाही; पण ती भावना मात्र अनुभवली आहे. दुखापतीमुळे फुटबॉल सोडावे लागले. पुढे काय करणार याबाबत काहीही निश्चित नव्हते. घरात बसून राहायचो. काय करावं हा प्रश्न सतावत होता. तेव्हा घरातच जीम सुरू केली आणि शरीरयष्टी बनवली. या शरीरयष्टीचा उपयोग व्हावा म्हणून ‘मिस्टर इंडिया’च्या मैदानात उतरलो. तेथे निवडला गेलो आणि येथून जीवनाला कलाटणी मिळाली. फुटबॉल सोडून ग्लॅमरच्या क्षेत्रात आलो. आज सुप्रानॅशनल जिंकलो. जेव्हा माझे नाव जाहीर झाले तेव्हा माझे  हात थरथर कापत होते. भावनाशून्य झालो होतो; कारण येथे देशाचे प्रतिनिधित्व होते. मी माझ्या परीने १०० टक्के योगदान दिले. ३९ देशांच्या स्पर्धकांतून निवड झाल्यानंतर सर्व काही स्वप्नवत वाटत होते.

बॉलिवूडमध्येही ‘एंट्री’ करणार सुप्रानॅशनल स्पर्धा जिंकल्यानंतर देशातीलच नव्हे तर विदेशातील चाहत्यांचीही संख्या जबरदस्त वाढली आहे. शुभेच्छां संदेशांच्या ओझ्याने फोनही बंद पडतोय. स्पर्धा जिंकल्यानंतर जीवन बदलल्यासारखे वाटतेय. स्टार झाल्याची कल्पना आनंद देऊन जातेय. मी रणवीर सिंगचा मोठा चाहता आहे. त्यानेही मला शुभेच्छा दिल्या होत्या. बॉलीवूडमधील बºयाच कलाकारांचे फोनही येतात. भविष्यात संधी मिळाली तर बॉलीवूडमध्ये निश्चितच ‘एंट्री’ करेन. परंतु, सध्या सुप्रानॅशनल आॅर्गनायझेशनसोबतएक वर्षाचा करार असल्याने माझ्याकडे वेळ नाही. या कालावधीत मला विश्वभ्रमण करायचे आहे. 

सुप्रानॅशनलबाबत...८ डिसेंबर २०१८ रोजी किनिका-झेडरोज (पोलंड) येथे मिस्टर सुप्रानॅशनलचे तिसरे सत्र पार पडले. यामध्ये अंतिम फेरीत जगातील ३९ स्पर्धकांमध्ये चुरस होती. त्यात गोव्याच्या प्रथमेशने किताब पटकाविला. याच स्पर्धेत ‘बेस्ट बॉडी आॅफ द इयर’चाही पुरस्कार त्याने नावे केला. शरीर तयार करण्यासाठी मी तीन वर्षांपासून कठोर मेहनत घेत होतो.आहार-विहार आणि व्यायाम मी अत्यंत काटेकोरपणे पाळला. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतो, असेही प्रथमेशने सांगितले. मॉडेलिंग अणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नवीन गुणवान लोकांचा शोध घेऊन त्यांना ‘ताबडतोब सेलिब्रिटी’ बनवणं हे या स्पर्धेचे ध्येय आहे.