शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्नने सरकारचा जावई होऊ नये, दुर्गादास कामत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:06 IST

सनबर्नचे आयोजक सरकारचे जावई झाले आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला.

- नारायण गावस

पणजी: सनबर्नने सरकारचा जावई होण्याचा प्रयज्ञ करु नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच शिवोलीच्या स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनी ३१ डिसेंबरला वागातोर येथे सनबर्न होणार नसल्याचे सांगितले आहे. तरीही  काही ॲपवर चोरट्या मार्गाने सनर्बनची तिकीट विकली जात आहे. याचा अर्थ हे सनबर्नचे आयोजक सरकारचे जावई झाले आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला.

३१ डिसेंबरला कुठलीच परवानगी मिळत नसताना असेच चोरट्या मार्गाने अशा ॲपवर तिकीट विक्री केली जात आहेत. एक तर ते सरकारच्या आदेशाला मानत नसेल किवा ते सरकारचे जावई  झाले आहेत. स्थानिक पंचायतीच्या आमदारांना तसेच लोकांना ३१ डिसेबरला सनबर्न पार्टी नको आहे. यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. लोकांना कुठेही फिरायला जाता येत नाही, असे असताना सनबर्नच्या आयोजनाच्या परवानगी शिवाय सर्व तयारी केली जाते. हे चुकीचे आहे. याचा आम्ही गाोवा फॉरवर्ड पक्षातर्फे विरोध करतो, असे दुर्गादास कामत म्हणाले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही याचा विरोध केला आहे. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने गोव्यात असे संगीताचे कार्यक्रम होत आहेत. पण त्यांनी सरकारचे कायदा सुव्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. जर स्थानिकांना हा सनबर्न नको असेल  तर आम्हाला  हा सनबर्न नको आहे. यातून स्थानिकांना काहीच फायदा नसतो. त्यामुळे  ३१ डिसेंबरला रात्री स्थानिक लोकांना  कुठे बाहेर फिरायला जात येत नाही. सर्वत्र गर्दी असते. पण आयोजक आपल्याला हवे ते  करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असे दुर्गादास कामत यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा