शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'सनबर्न' यंदा दक्षिण गोव्यात; कंपनीकडून जाहीर : यावर्षी संगीतासह पाण्याखालील जगाची सफर

By किशोर कुबल | Updated: July 12, 2024 15:39 IST

पणजी : डिसेंबरअखेर वागातोर येथे होणारा सनबर्न इलेक्ट्रॉनिक्स डान्स फेस्टिवल यंदा दक्षिण गोव्यात होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ...

पणजी : डिसेंबरअखेर वागातोर येथे होणारा सनबर्न इलेक्ट्रॉनिक्स डान्स फेस्टिवल यंदा दक्षिण गोव्यात होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यावर्षी संगीत व नृत्यासह पाण्याखालील जगाची सफर हा अनुभव अनोखा घेता येईल.

आशियातील हा आघाडीचा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) फेस्टिव्हल मानला जातो. त्या ईडीएमचे यंदाचे हे १८ वे वर्ष आहे. दक्षिण गोव्यात २८ ते ३० डिसेंबर असे तीन दिवसात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ठिकाण नंतर जाहीर केले जाईल. यामध्ये अजोड संगीत, फॅशन, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा आनंद  प्रेक्षकांना घेता येणार आहे.

दरवर्षी इयर एंडला होणाऱ्या या ईडीएमला देश, विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने येतात.  त्याचे ऑनलाइन बुकिंग जून, जुलैपासून सुरू होत असते. ईडीएमच्यावेळी वागातोर येथे किनारी भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत होत असे. त्यामुळे स्थानिकांचाही विरोध होता. आता ट्रॅफिक, प्रवेश, निर्गमन आणि पार्किंग सारख्या समस्यांवर उपाय मिळणार आहे असल्याचा दावा केला जात आहे. त्याच बरोबर फेस्टिव्हल मध्ये पुन्हा एकदा कँपसाईट असणार आहे.सनबर्नचे सीईओ करण सिंग यांनी सांगितले “ नवीन जागेत आयोजन  करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. दरवर्षी कार्यक्रमाचा दृष्टिकोन उंचावून अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तसेच  लोकांना हा अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत.'

ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष जॅक सुखीजा यांनी सांगितले “ सनबर्नमुळे गोव्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे, स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असून, विविध क्षेत्रातील व्यवसायांत वाढ झाली आहे.'

दरम्यान, गोव्यात नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या देश, विदेशी पर्यटकांमध्ये हा ईडीएम आकर्षणाचा ठरला आहे. फेस्टिवलमध्ये होणाऱ्या ड्रग्स सेवनामुळे तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला आहे. यापूर्वी या फेस्टिवलमध्ये ड्रग्स सेवनाने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेले आहेत‌.

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल