शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

३१ डिसेंबरला सनबर्नचे आयोजन रद्द; आमदार डिलायला लोबो यांची माहिती

By काशिराम म्हांबरे | Updated: December 2, 2023 14:55 IST

स्थानीक आमदार डिलायला लोबो यांनी या संबंधीची माहिती पत्रकारांना दिली.

वागातोर-हणजूण येथील काही स्थानीकांनी, व्यवसायिकांनी तसेच लोकप्रतिनीधींनी ३१ डिसेंबर या दिवशी  सनबर्नमहोत्सवाच्या आयोजनाला हरकत घेतल्यानंतर त्या दिवशीचा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

स्थानीक आमदार डिलायला लोबो यांनी या संबंधीची माहिती पत्रकारांना दिली. २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान सनबर्न महोत्सवाचे वागातोर परिसरात आयोजन करण्यात आला आहे.  स्थानिकांनी आपली कैफियत आमदार डिलायला लोबो यांच्याशी मांडली होती. आमदारांनी नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावेळी ३१ रोजी महोत्सव  होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला स्पष्ट केल्याची माहिती लोबो यांनी पत्रकारांना दिली.

डिलायला लोबो यांच्या सोबत कळंगुटचेआमदार मायकल लोबो तसेच इतर काही पक्षांकडून ३१ डिसेंबर रोजीच्या आयोजनाला विरोध दर्शवला होता. त्या दिवशी महोत्सवाचे आयोजन रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली. ३१ डिसेंबर रोजी ख्रिश्चन समाजातील लोक मध्यरात्री चर्चीत प्रार्थनेसाठी जातात. त्या दिवशी स्थनिकांना रेस्टॉरंटातील व्यवसाय चांगल्या पद्धतीनेचालतो.  महोत्सव झाल्यास या सर्वांवर त्याचे परिणाम होतील अशी माहिती लोबो यांनी दिली. आपल्या मते पहिल्या तीनच दिवशी या महोत्सवाचे आयोजन व्हायला हवे असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :goaगोवा