शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कॉंग्रेस आमदार व आमदाराच्या पुत्राला समन्स, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:27 IST

खाण घोटाळा प्रकरणात कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना विशेष तपास पथकाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांना एसआयटीच्या रायबंदर येथील कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 

पणजी: खाण घोटाळा प्रकरणात कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना विशेष तपास पथकाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांना एसआयटीच्या रायबंदर येथील कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रॉय नाईक यांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची खाण नाही. तसेच ते खनिज वाहतूकदारही नाहीत. परंतु त्यांचा खनिज घोटाळ््याशी संबंध असल्याचा एसआयटीचा दावा आहे. एसआयटीकडे या संबंधी पुरावे मिळाल्याचाही दावा एसआयटीकडून करण्यात आला  आहे. खाण घोटाल्यात त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे एसआयटीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातही त्यांचा उल्लेख नाही,  परंतु एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही गब्बर खनिज ट्रेडरशी त्यांचा संबंध असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. तसेच खाण घोटाळ््यातील प्रकरणातच त्यांचा सहभाग आढळून आल्याचा दावाही एसआयटीने केला आहे. या विषयी एसआयटीचे अधीक्षक कार्तीक कष्यप यांना विचारले असता त्यांनी रॉय यांच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे तयंनी सांगितले. त्या बाबतीत एवढ्यात वाच्चता करणे योग्य होणार नाही. शुक्रवारी त्यांच्या चौकशीच्यावेळी त्यांनाच या विषयावर प्रश्न केले जातील असे त्यांनी सांगितले.३५० हजार कोटी रुपयांच्या खनिज घोटाळ्याची चौकशी करणा-या एसआयटीकडून अतापर्यंत सहा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत.  मुख्य प्रकरणातही दोन दिवसांपूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील केवळ १३५ कोटी रुपयांच्या बाबतीत हे आरोपपत्र असून नंतर टप्प्या टप्प्यांने इतर प्रकरणे जोडली जाणार आहेत. रॉय नाईक यांना मुख्य गुन्ह्यातील नेमक्या कोणत्या खाणीच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत हेही एसआयटीकडून अद्याप स्पष्ट केलेले नाही. रॉय नाईक हे अलिकडेच राजकारणात सक्रीय झाले आहेत. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा फार मोठा पराभव झाला होता.

टॅग्स :goaगोवा