शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:26 IST

सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता.

पणजी : सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. मगोपचे नेते असलेले मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्याचे पालन केले नाही. यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले.सचिवालयात पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, शिरोड्यात मगोपने विधानसभेची पोटनिवडणूक लढवू नये असे ठरले होते. भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांच्यासोबत मगो नेत्यांची चर्चा झाली होती. मी स्वत:ही सुदिन ढवळीकर यांच्याशी बोललो होतो. मात्र ते ऐकले नाहीत. शेवटी राज्याचे हित महत्त्वाचे असते, भावाचे हित नव्हे.सावंत म्हणाले, की आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर घडत असते. मगोपने हा कार्यक्रम पाळला नाही. फॉर्म्युला मानला नाही. शिरोडा मतदारसंघात मगोपने उमेदवार उभे करणे ही पूर्णपणे त्या पक्षाची चूक आहे. आम्ही मगो पक्ष फोडला नाही. मगोपच्या दोघा आमदारांना मगोमध्ये असुरक्षित वाटू लागले. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांना प्रवेश दिला. कुणीही भाजपमध्ये येत असल्यास आम्ही स्वागत करू.काँग्रेसचे कुणी आमदार भाजपामध्ये येऊ पाहत आहेत काय, असे पत्रकारांनी विचारले असता, आम्ही तसे काही ऐकलेले नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मगोपने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याविषयी काय वाटते, असे विचारताच सावंत म्हणाले, की मगोपच्या निर्णयाचा भाजपवर काही परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहता, लोकसभेच्या गोव्यातील दोन जागा आणि पोटनिवडणुकीवेळी विधानसभेच्या तिन्ही जागा भाजपा जिंकेल.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा