शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मांडवीत सागरी विमानाची यशस्वी चाचणी

By admin | Updated: May 24, 2015 01:21 IST

पणजी : गोवा पर्यटनविभागाद्वारे पाण्यात उतरणाऱ्या नऊ आसनी समुद्री विमानाची शनिवारी मांडवी नदीच्या पात्रात यशस्वी चाचणी करण्यात आली.

पणजी : गोवा पर्यटनविभागाद्वारे पाण्यात उतरणाऱ्या नऊ आसनी समुद्री विमानाची शनिवारी मांडवी नदीच्या पात्रात यशस्वी चाचणी करण्यात आली. कुतूहल आणि उत्साही वातावरणात सागरी विमान मांडवी नदीत उतरले. महाराष्ट्रानंतर गोव्यात अशा प्रकारची सेवा पर्यटकांसाठी आता सुरू होणार आहे.या विमानाने दाबोळी विमानतळ ते मांडवी जेटीपर्यंत प्रवास केला. गोवा पर्यटनाद्वारे मारिटाइम एनर्जीहेली एअर सर्व्हिसेस प्रा.लि.(मेहेर) यांच्याबरोबर समुद्री विमान सेवा सुरू करण्यासाठी २०१२ मध्ये करार केला होता. समुद्री विमान उडविण्यासाठी दोनापावल, कोको बिच, (नेरुळ) मिरामार, शापोरा आणि मांडवी नदी यांसारख्या विविध ठिकाणांची चाचपणी सुरू होती. विमानाची समुद्रात यशस्वी चाचणी होताच पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष व आमदार नीलेश काब्राल यांनी दोन वर्षांची घेतलेली मेहनत फळाला आली, अशी प्रतिक्रिया दिली. पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी सांगितले की, पर्यटन खात्याद्वारे गोव्यात पर्यटकांची संख्या वाढावी त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पाण्यावर चालणारी बस, हॉट एअर बलून या प्रकल्पांनंतर आता समुद्री विमानाला यात समाविष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली आहे. या सेवेचा प्रारंभ आॅगस्टच्या मध्यंतरी होणार आहे. सध्या नऊ आसनी विमान आहे. त्यामुळे याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला, तर भविष्यात सोळा सीटर समुद्री विमान बनविण्याबाबत विचारविनिमय केला जाईल. शिवाय लोकांच्या प्रतिसादाप्रमाणे मार्गही वाढविण्यात येतील. दरम्यान, विमान चाचणीवेळी अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी मच्छीमारी खाते, बंदर कप्तान आणि किनारी पोलिसांच्या मदतीने अंतर्गत जलवाहतूक, मच्छीमारी, जलक्रीडा हे काही वेळासाठी रोखले होते. विमानाच्या यशस्वी चाचणीनंतर पुन्हा मच्छीमारी बोटींना समुद्रात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली.(प्रतिनिधी)