शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

देशाला आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद सहकारात - सुभाष शिरोडकर

By आप्पा बुवा | Updated: October 20, 2023 18:49 IST

सहकार खात्यातर्फे चार नव्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांना मंजुरीपत्रे देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते.

शिक्षणानंतर दुसरे सर्वात महत्त्वाचे कुठले खाते असेल तर ते सहकार हे खाते आहे. सहकार क्षेत्रात असणाऱ्या लोकांनी त्यासाठी नियोजनपूर्वक काम करायला हवे. केंद्र सरकारने सुद्धा सहकार खात्याचे महत्त्व लक्षात घेऊन पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरू केले आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकास साधता येतो. देशाला आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद सहकारात आहे. असे उद्गार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले. सहकार खात्यातर्फे चार नव्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांना मंजुरीपत्रे देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, सहकार खात्याचे उपनिबंधक सिताराम सावळ, क्षेत्रीय कृषी अधिकारी संतोष गावकर, गोवा डेरीचे डॉ. रामा परब आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सहकार क्षेत्रची आम्हाला अजून भरभराट करायची आहे. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी ध्येय निश्चित करून काम करायला हवे. प्रत्येकाने आपला तालुका सहकार क्षेत्रात अग्रेसर करणार असे जरी स्वप्न पाहिल्यास सहकार चळवळ गोव्यात आणखीन समृद्ध होत जाईल. 

सहकारी संस्थावर अध्यक्षपद व संचालक पदी असलेल्या लोकांना आवाहन करताना ते म्हणाले की पद मिरवण्याकरता म्हणून सहकार क्षेत्रात येऊ नका. त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक पदाधिकाऱ्यानी सहकार क्षेत्र गांभीर्याने घेतल्यास त्या संस्थेचा उद्धार तर होईलच, पर्यायाने देशाच्या सहकार क्षेत्राला बळकटी येईल. यापुढे तालुकास्तरीय काम करत असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थांचा त्रीमासिक मूल्यांकन केले जाईल. प्रत्येक तीन महिन्यानंतर एका तालुक्याचे मूल्यांकन करून नक्की कुठली संस्था कशा प्रकारे काम करते याचा लेखाजोखा संस्थेच्या अध्यक्षांकडून घेण्यात येईल.यावेळी राज्यात कार्यरत असलेल्या पतसंस्थांना आवाहन करताना ते म्हणाले की पतसंस्था चालवणाऱ्या संचालकांनी लक्षात घ्यायला हवे की पतसंस्था म्हणजे सावकारची पतपेढी नाही. पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य व गरीब लोकांचा उद्धार व्हायला हवा. त्यासाठीच यापुढे मर्जीनुसार व्याजदर लावता येणार नाही. सरकार यापुढे 13 टक्के व्याजदर निश्चित करणार आहे. अशाने सामान्य लोकांना कर्ज फेडणे सोपे होईल. अप्रत्यक्ष फायदा त्या पतसंस्थेला सुद्धा होणार आहे.

सहकार क्षेत्रातील काही कायदे हे फार जुने आहेत याची जाण सरकारला आहे. त्याकरता सहकार क्षेत्रात नव्हे बदल आणण्यासाठी व सहकार क्षेत्र चांगल्या तऱ्हेने चालण्यासाठी नवीन कायदे अमलात आणले जाणार आहे. त्याची कार्यवाही काही दिवसातच होणार आहे. असे सुतोवाच सुद्धा यावेळी शिरोडकर यांनी केले.यावेळी बोलताना फळदेसाई म्हणाले की  गोव्यात कोमूनिदाद ह्या संस्थेकडे व इतर काही संस्थांकडे पडीक जमिनी आहेत. त्या जमिनी सरकारच्या माध्यमातून लागवडीखाली आल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याबरोबरच त्या संस्थाना सुद्धा त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो. परंतु यासाठी चांगल्या कायद्यांची गरज आहे. जेणेकरून जमिनी देण्यासाठी लोक पुढे येतील. सुरुवातीला पंकज मराठे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले.

टॅग्स :goaगोवा