शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सशक्त स्त्रिया सुदृढ परिवाराचा पाया; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस वाळपईत उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वयाच्या ७५ च्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अखंडपणे दीडशे कोटी जनतेची सेवा करण्यास तत्पर आहेत. महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी 'नारी सन्माना'च्या विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. घरातील सशक्त स्त्रिया सुदृढ परिवाराचा पाया आहे. घरातील स्त्री आजारी पडली तर ते कुटुंबच आजारी पडते. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या सुदृढ नारी सशक्त परिवार, महिला कल्याणच्या, महिला सन्मानाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

वाळपई कदंबा बसस्थानक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सबलीकरण व सेवा पंधरवडा या कार्यक्रमामध्ये मंत्री राणे बोलत होते. यावेळी पंतप्रधानांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मध्यप्रदेश येथून दृकश्राव्य पद्धतीने थेट प्रक्षेपित करण्यात आला होता.

तद्नंतर दुर्गा मूर्तींचे पूजन व सामुदायिक आरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी उत्तम आयुष्य व आरोग्य लाभो, अशी प्रार्थना आरोग्यमंत्री राणे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे, केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकारी, गोवा आरोग्य खात्याचे विविध अधिकारी, सरपंच पंचसदस्य व हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले की, घरातील स्त्री ही कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असली पाहिजे. यासाठी त्यांचे आरोग्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

...तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल

'स्वस्थ्य नारी, सशक्त परिवार' हा मूलमंत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गोरगरीब महिला शक्तीचा सन्मान करून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून आरोग्य शिबिरांचे विविध राज्यांत आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या घरातील स्त्री ही नुसती चूल व मूल बघत नाही, तर ती स्वतःच्या नवऱ्याचा आधार असते. येणारी पुढील पिढी घडविण्याचे कार्य ती अखंड करीत असते. प्रत्येक घरातील स्त्री सशक्त झाली तर आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नमूद केले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण