शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशात उभारणार दिवंगत पर्रीकर तसेच डिसोजा यांचे पुतळे

By काशिराम म्हांबरे | Updated: May 4, 2023 16:22 IST

माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर आणि माजी उपमुख्यमंत्री कै. फ्रान्सिस डिसोजा यांचे पुतळे त्यांच्या जन्म गावी उभारण्याचा ठराव नगरपालिकेत सर्वमताने मंजूर

काशीराम म्हाबरे, लोकमत, म्हापसा: गोव्यातील माजी दोन दिवंगत नेते माजी संरक्षण मंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय ॲडव्होकेट फ्रान्सिस डिसोजा यांचे पुतळे त्यांच्या जन्म गावी म्हापसा शहरात उभारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा ठराव येथील नगरपालिकेने सर्वमताने मंजूर केला आहे. म्हापसा नगरपालिकेच्या आज संपन्न झालेल्या सर्वसाधारण बैठकीत यासंबंधीचा ठराव सर्व मताने मंजूर करण्यात आला. या दोन्ही नेत्यांचे पुतळे म्हापसा नगरपालिकेच्या आवारात उभारण्यात येणार आहेत.

मूळ प्रस्ताव बहुजन हिताय संघातर्फे सादर करण्यात आलेला. त्यात त्यानी डिसोजा यांचा पुतळा शहरात उभारण्याची परवानगी नगरपालिकेजवळ मागितली होती. सादर करण्यात आलेल्या सदर प्रस्तावाचे नगरसेवकांनी स्वागत करून मूळ प्रस्तावात दुरुस्ती सुचवण्यात आली. स्वर्गीय मनोहर पर्रीकर हे देखील मूळ  याच शहरातील असल्याने डिसोजा यांच्यासोबत पर्रीकरांचाही पुतळा उभारण्यात यावा अशा सूचना काही नगरसेवकांकडून मांडण्यात आल्या. सुचवण्यात आलेली दुरुस्ती नंतर मंजूर करण्यात आली. पुतळ्याचा मूळ प्रस्ताव सादर करणाऱ्या बहुजन हिताय संघाच्या प्रस्तावात करण्यात आलेली दुरुस्ती त्यांना  मान्य नसेल नगरसेवक ॲडव्होकेट तारक आरोलकर यांनी पर्रीकर यांचा पुतळा स्वखर्चाने बांधून देण्याची घोषणा केली. आरोलकरांनी केलेली सूचना नंतर मंजूर करून घेण्यात आली.

स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसोजा हे दोन्ही नेते म्हापसा शहरतील आहेत. मात्र पर्रीकर  यांनी गोवा विधानसभेची निवडणूक पणजी मतदार संघातून तर डिसोजा  यांनी म्हापसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा