शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या पहिल्या पर्यटन संचालक ॲड.लिबिया लोबो सरदेसाई यांचा १०० वा वाढदिवस, पर्यटन खात्यातर्फे सत्कार

By समीर नाईक | Updated: May 26, 2024 16:24 IST

 लिबिया लोबो या स्वातंत्र्य गोवा, दमण आणि दीवच्या पहिल्या पर्यटन संचालक होत्या. या अग्रगण्य भूमिकेत त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या सुधारणेसाठी काम केले. 

पणजी: स्वातंत्र्यसैनिक आणि गोवा, दमण आणि दीवच्या पहिल्या पर्यटन संचालक लिबिया लोबो सरदेसाई  यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन खात्याच्या वतीने पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन खात्याचे विद्यमान संचालक सुनील अंचिपाका, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 लिबिया लोबो या स्वातंत्र्य गोवा, दमण आणि दीवच्या पहिल्या पर्यटन संचालक होत्या. या अग्रगण्य भूमिकेत त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या सुधारणेसाठी काम केले. 

हा सत्कार समारंभ लिबिया लोबोच्या चिरस्थायी वारशासाठी योग्य आदर आहे. हा त्यांचे पती पद्मश्री (दिवंगत) वामन सरदेसाई यांच्यासमवेत स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची निर्णायक भूमिकाचाच नव्हे तर पर्यटन खात्यातील त्यांच्या सहभागाचाही गौरव आहे. 

अंगोलाचे राजदूत म्हणून नियुक्त झालेले आदरणीय पद्मश्री (दिवंगत) वामन सरदेसाई यांच्या पत्नी लिबिया लोबो यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नोव्हेंबर १९५५ ते २० डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्तीपर्यंत महत्त्वाची माहिती प्रसारित करणारे भूमिगत रेडिओ स्टेशन चालवून या जोडप्याने विलक्षण धैर्य आणि समर्पण दाखवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुक्ती चळवळीला अमूल्य पाठिंबा मिळाला, प्रतिकाराची भावना जिवंत ठेवली. जेव्हा गोवा स्वातंत्र्य झाला तेव्हा लिबिया लोबो सरदेसाई यांनी ‘गोवा अखेर मुक्त झाला आहे’ अशी घोषणा भारतीय हवाई दलाच्या  विमानातून फिरून केली होती.

गोवा पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका,  यांनी लिबिया लोबो सरदेसाई यांच्या आदरार्थी भावनेबद्दल आणि गोवा मुक्ती चळवळीतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल मनापासून कौतुक आणि आदर व्यक्त केला.  तसेच त्यांची जीवनकथा हा एक ऐतिहासिक वारसा आहे, जो राज्यातील प्रत्येक व्यक्तीने जतन केला पाहिजे. विशेषत: तरुण पिढीने यातून प्रेरणा घ्यावी, असे अंचिपाका यांनी सांगितले.