शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी कोणत्या नियमाखाली परवाना दिला ते सांगा : खंवटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 12:58 IST

आम्ही मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात होतो, तेव्हा देखील मोपा विमानतळाला आम्ही पाठिंबाच दिला.

पणजी : मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिलेला आम्हा सर्वांनाच हवा आहे. आम्ही विमानतळाला पाठिंबाच दिला आहे, पण विद्यमान सरकारने 49 कोटी रुपयांचे शुल्क न घेता माडा यंत्रणेच्या कोणत्या नियमाखाली विमानतळ बांधकामासाठी कंत्राटदार कंपनीला परवाना दिला ते सांगावे, असे आव्हान अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी दिले आहे.विमानतळ विषयावर खंवटे यांनी लोकमतला मुलाखत दिली. आम्ही मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात होतो, तेव्हा देखील मोपा विमानतळाला आम्ही पाठिंबाच दिला. माडा यंत्रणा स्थापन झाल्यानंतर या यंत्रणेचे सगळे नियम, उपनियम तयार व्हायला हवेत. विद्यमान सरकारने ते केले नाही. माडा यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत आहे की नगरपालिका आहे की पीडीए आहे हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. कारण माडा यंत्रणेने पंचायती, पालिका व पीडीएचेही अधिकार स्वत:कडे घेतले आहेत, असे खंवटे म्हणाले. जीएमआर कंत्राटदार कंपनीने जेव्हा विमानतळ बांधकामासाठी परवाना मागितला, तेव्हा अगोदर माडा यंत्रणेने कंत्रटदार कंपनीला पत्र पाठवले व 49 कोटींचे परवाना शुल्क भरा, अशी सूचना केली. मग कंपनीने एक हमीपत्र दिले व शुल्क न भरता परवाना मिळवला. हा परवाना कोणत्या नियमांखाली दिला ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला सांगावे, कारण मुख्यमंत्री सावंत हेच माडा यंत्रणेचे चेअरमन आहेत, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.गोवा राज्य आर्थिक संकटात आहे. सातत्याने सरकार कर्जे काढते. कोविड व्यवस्थापनाच्या आघाडीवर सरकारचा गोंधळ आहे. सरकारकडे निधी नाही, अशावेळी विमानतळासाठी बांधकाम परवाना देताना 49 कोटींचे शुल्क माडा यंत्रणेने घेतले असते तर तेवढे तरी पैसे सरकारी तिजोरीत आले असते. अशा प्रकारचे कोणत्या कंपनीला कधी शुल्क न घेता केवळ हमीपत्राच्या आधारे बांधकाम परवाना दिला गेला आहे काय तेही सरकारने सांगावे. जर 49 कोटींचे शुल्क कमी करावे, असे संबंधित कंपनीला वाटत असेल तर माडा यंत्रणेने त्याविषयी काय तो निर्णय घ्यायला हवा होता, पण परवाना शुल्क भरून न घेता देणे म्हणजे घोटाळा झाला. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याविषयी काय ते उत्तर द्यावे असे खंवटे म्हणाले.